Rhea Chakraborty Boyfriend Instagram
मनोरंजन बातम्या

Rhea Chakraborty Boyfriend: रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा पडली प्रेमात?, प्रसिद्ध बिझनेसमनलाच करतेय डेट

Rhea Chakraborty And Nikhil Kamath Relationship Rumors: सध्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती एका अब्जाधीश बिझनेसमनला डेट करत असल्याची माहिती मिळत आहे.

Chetan Bodke

Rhea Chakraborty Latest News

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती कमालीची चर्चेत आली आहे. कायमच चित्रपटामुळे नाही तर ती तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी देखील अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या खासगी आयुष्यामुळेच चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्री एका अब्जाधीश बिझनेसमनला ती डेट करत असल्याची माहिती मिळत आहे. सुशांत सिंगच्या निधनानंतर रियाच्या आयुष्यात एका बिझनेसमनची एन्ट्री झाल्यामुळे ती तुफान चर्चेत आली आहे.

सध्या रिया चक्रवर्तीचं बिझनेसमन निखिल कामतसोबत नाव जोडलं जात आहे. अनेक मीडिया रिपोर्टनुसार, निखिल कामत हा ‘जेरोधा’ या इंडियन फायनंशियल कंपनीचा को-फाउंडर आहे.. रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात निखिलच्या माध्यमातुन प्रेमाची एन्ट्री झाल्यामुे ते तुफान चर्चेत आले आहे. पण या दोघांनीही याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून या केवळ अफवा आहेत.

अनेकदा रिया चक्रवर्ती तिच्या लव्ह लाईफमुळे बरीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रिया टीम इंडियाचा दिग्गज बॅट्समन विराट कोहलीचा मॅनेजर बंटी सजदेहसोबत देखील तिचं नाव जोडलं होतं. बंटीबद्दल सांगायचं तर, बॉलिवूडचा भाईजानची वहिनी सीमाचा तो भाऊ आहे. सोबतच निखिलने अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला देखील डेट केल्याच्या चर्चा आहेत.

रिया सध्या ३१ वर्षांची तर, निखिल कामत ३६ वर्षांचा आहे. रिया सध्या रोडिज या रिॲलिटी शोमध्ये गँग लिडरचे पात्र साकारताना दिसत आहे. निखिलहा बिझनेस क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा असून त्याने डाऊन टू अर्थ आपल्या व्यावासयिक आयुष्याची सुरूवात केली. तो जॉबसोबतच स्टॉक मार्केटमध्येही ट्रेडिंग करतो. ‘जेरोधा’ कंपनीमध्ये निखिलसोबतच त्याच्या भावाचीही पार्टनरशिप आहे. निखिलने खूप लहान वयातच प्रसिद्धी मिळवली. त्याने आपल्या कमाईतला अर्धा हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला होता.

निखिल कामतने इटलीतील अमांडा पूरवांकारासोबत २०१९ सोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांचे काही नाते जास्त काळ टिकले नाही अवघ्या काही दिवसातच त्यांनी एकमेकांसोबत वेगळा राहण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीत दिव्यामध्ये केसर टाकल्यास काय होतं?

Maharashtra Live News Update: निलेश घायवळच्या पासपोर्ट रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांचा न्यायालयात अर्ज

Nagpur Crime : मुलगा-सून मुंबईला गेले, घरात आईची निर्घुण हत्या; नागपूरात भयकंर घडलं

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT