दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी 'या' अभिनेत्रीचा नकार  Saam Tv
मनोरंजन बातम्या

दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी 'या' अभिनेत्रीचा नकार

तारक मेहता का उल्टा चष्मा या सिरीयल मधील दिशाची दयाबेन भूमिका फार लोकप्रिय आहे. तिच्या बोलण्याच्या शैलीवरून आणि अभिनयावरून दयाबेनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेत्री रुपाली गांगुलीची (Rupali Ganguly) स्टार टीव्ही शो 'अनुपमा' ही सिरीयल सध्याच्या काळात सर्वात लोकप्रिय सिरीयल मनाली जात आहे. परंतु, याच्या अगोदरही या सिरियलने अशीच लोकप्रियता मिळवली होती. एकेकाळी 'ये है मोहब्बते' हा टीव्ही शो टीआरपीच्या उच्च स्थानावर होता. या शो ची अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी- दहियाला (Divyanka Tripathi) घरोघरी लोकप्रियता मिळाली होती. दिव्यांका सध्या खतारों के खिलाडी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी केपटाऊनमध्ये आहे.

दरम्यान, दिव्यांकाशी संबंधित एक महत्वाची माहिती समोर आली आहे. माध्यमाच्या अहवालानुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सिरीयलसाठी दिव्यांका त्रिपाठी- दहियाला 'दयाबेन' या पात्रासाठी ऑफर देण्यात आली आहे. परंतु, तिने ही ऑफर नाकारल्याचे वृत्त समोर येत आहे. याबात दिव्यांककडून कसलाच खुलासा करण्यात आलेला नाही.

दिशा वाकनीने सिरीयल सोडली ?

दिशा वाकानी परत शोमध्ये येणार का? याबाबत चर्चा सुरु असतानाच ही बातमी समोर आली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या सिरीयल मधील दिशाची दयाबेन भूमिका फार लोकप्रिय आहे. तिच्या बोलण्याच्या शैलीवरून आणि अभिनयावरून दयाबेनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. दिव्यांका सध्या खतरों के खिलाडीच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दिव्यांका खतरों के खिलाडी या शोमध्ये येताच ये शो लोकप्रियता आणखी वाढली आहे.

तारक मेहताचे निर्मात्यांची भूमिका

निर्माते असिद मोदी यांनी एका वेब साईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले '' मला वाटत की मीच आता दयाबेनची भूमिका केली पाहिजे. अनेक दिवसापासून दयाबेनच्या परत येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात येत आहेत. असिद मोदी म्हणाले आम्ही दिशा परत येण्याची वाट पाहता आहोत. परंतु दिशेने शो सोडण्याचा विचार कला असेल तर आम्ही नवीन दयाबेन सोबत पुढे जाऊ''.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT