Rashmika Mandanna Animal Movie Look Instagram
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Animal Movie Look: ‘ॲनिमल’मधली सोज्वळ ‘गीतांजली’ पाहिलीत का?, रश्मिका मंदान्नाच्या फर्स्ट लूकने वेधले साऱ्यांचेच लक्ष

Animal Movie Celebrity Look: ‘ॲनिमल’मधील रणबीर कपूरच्या लूकनंतर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेते अनिल कपूर यांचा आता लूक समोर आला आहे.

Chetan Bodke

Rashmika Mandanna And Anil Kapoor Animal Movie Look

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ॲनिमल’ची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. अनेकदा प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाल्यानंतर अखेर प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट येत्या १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’मधील एक लूक प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील काही पात्रांचे लूक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेते अनिल कपूर यांचा लूक समोर आला आहे. दोघांचाही लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्नाचा लूक चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान अनिल कपूर यांच्या लूकबद्दल बोलायचे तर, ते चित्रपटामध्ये बलबीर सिंग नावाचे पात्र साकारणार आहेत. शेअर केलेल्या पोस्टमध्ये बलबीरचा हा रुग्णालयातील लूक दिसून येत आहे. हातात सलाईन, अंगावर बँडेज आणि नजरेत असलेला राग प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. अनिल कपूरचा लूक शेअर करताना, “अ‍ॅनिमल का बाप... बलबीर सिंह!” अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

रश्मिकाच्याही लूकची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. रश्मिका चित्रपटामध्ये गीतांजली नावाचे पात्र साकारणार आहे. तिचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्रीच्या लूकबद्दल सांगायचे तर, तिने हलका मेकअप, लाल पांढरी साडी परिधान केली आहे. चित्रपटाच्या लूकविषयी सांगताना अभिनेत्रीने ‘गीतांजलीच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना!’ म्हणत तिने फोटो शेअर केला आहे.

येत्या २८ सप्टेंबरला अर्थात अभिनेता रणबीर कपूरच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीर कपूरसोबत चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी हे कलाकार दिसणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करणार आहेत. १८ सप्टेंबरला रणबीरचा चित्रपटातला पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला होता. रावडी लूक, डोळ्याला गॉगल, तोंडात सिगारेट अन् बॉसी लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bahadurgad Fort History: छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बहादूरगड, वाचा इतिहास

Skin Care Tips: दिवाळीत दिसा सुंदर! या 3 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नॅचरल ग्लो

Dhanteras Puja: धनत्रयोदशीची पूजा कशी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT