Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Marriage Date Instagram
मनोरंजन बातम्या

Rakul- Jaccky Wedding: रकुल प्रीत सिंह लवकरच अडकणार विवाहबंधनात; बॉयफ्रेंडसोबत 'या' खास ठिकाणी करणार लग्न

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Wedding: येत्या फेब्रुवारी महिन्यात हे कपल एका खास ठिकाणी लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा होत आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हे कपल लग्नबंधनात अडकेल.

Chetan Bodke

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Marriage Date

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीच्या (Jackky Bhagnani) रिलेशनची अनेकदा चर्चा रंगली होती. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर धरला आहे. यांच्या लग्नाची चर्चा नववर्षापासून होत आहे. नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, येत्या फेब्रुवारी महिन्यात हे कपल गोव्यात लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा होत आहे. (Bollywood)

रकुल आणि जॅकी २१ फेब्रुवारीला गोव्यात मोजक्याच लोकांमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत जोडप्याने लग्नगाठ बांधणार आहे. १९ आणि २० फेब्रुवारीला हे कपल प्री- वेडिंग करणार आहे. बॉम्बे टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, रकुल आणि जॅकीच्या जवळच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्याही लग्नाची तारीख गुपित ठेवण्यात आली आहे. (Bollywood Actress)

रकुल आणि जॅकीच्या लग्नाच्या तारखेबद्दल गुपित ठेवण्यात आले आहे. रकुलच्या लग्नातला लूक प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानी डिझाइन करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. रकुल आणि जॅकीने अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी आपली लव्ह लाईफ कधीही कोणापासून लपलेली नाही. हे कपल 2021 पासून एकमेकांना डेट करत आहे. नेहमी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता हे कपल लग्न करणार असल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. (Bollywood News)

एका मुलाखतीदरम्यान रकुलने तिची आणि जॅकीची ओळख कशी झाली याबद्दल सांगितले होते. "आम्ही दोघेही शेजारी- शेजारीच राहायला होतो. पण आम्ही केव्हाही एकमेकांसोबत बोललो नाही. आम्ही लॉकडाऊनच्या काळात एक कॉमन फ्रेंडच्या ओळखीने एकमेकांचे मित्र झालो. त्यानंतर आम्ही दोघेही बेस्ट फ्रेंड झालो. आम्ही बराच वेळ एकमेकांसोबत बोलायला लागलो आणि त्यानंतर एकमेकांना डेट करायला लागलो." असं स्वत: अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये सांगितले.

रकुल प्रीत सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, रकुल कमल हासन यांच्यासोबत 'इंडियन 2' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा प्रीक्वल 1996 मध्ये रिलीज झाला होता. तर जॅकी त्याची पुढील निर्मिती असलेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या रिलीजची वाट पाहत आहे. जफर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय, टायगर, सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत आहेत. 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावणात वांगी का खाऊ नये? जाणून घ्या

Saiyaara: 'सैयारा' चित्रपटासाठी 'ही' बॉलिवूडची फेमस जोडी होती पहिली पसंती

Maharashtra Live News Update: - जायकवाडीच्या नाथसागरात जलपूजन; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन

Railway Ticket Clerk : प्रवाशांची तिकिटासाठी मोठी रांग, तरीही बुकिंग क्लर्क फोनवर बिझी; संताप आणणारा व्हिडिओ

World Lung Cancer Day 2025: फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास सुरूवातीला काय लक्षणं दिसतात? वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT