Rakhi Sawant Mother Passes Away  Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Mother Passes Away : अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं निधन, ब्रेन ट्युमरशी झुंज अपयशी

मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री राखी सावतंची आईचं निधन झालं आहे.

Satish Daud

Rakhi Sawant Mother Passes Away : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत यांचं निधन झालं आहे. जया सावंत या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीचा पती आदिल दुर्रानी यांनी जया यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. आईच्या निधनाने राखी सावंतवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून राखीच्याआईची प्रकृती खालावली होती. जया सावंत यांना ब्रेन ट्युमर झाला होता. अनेकदा राखी आपल्या आईच्या प्रकृतीबाबत अपडेट सुद्धा देत होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास रुग्णालयात उपचार सुरू असताना जया सावंत यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी राखी सावंतने (Rakhi Sawant) नऊ लाख रुपये घेतले आणि बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला होता. आपण हे पैसे आपल्या आईच्या उपचारासाठी घेत असल्याचे म्हटले होते. बिग बॉसच्या चाहत्यांनी आपल्याला खूप प्रेम दिले. मराठी प्रेक्षकांची मी आभारी आहे. मला समजून घ्या, असं तिने म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी राखीने आईच्या आजारपणाबद्दल सांगितलं. यावेळी राखी म्हणाली की, 'आईला ओळखता येत नाहीये. तिला जेवायलाही जमत नाही. आईचं अर्ध्या शरीराला अर्धांगवायू झाले आहे. मला अंबानी यांचे आभार मानायचे आहेत. अंबानी माझ्या आईच्या उपचारात मदत करत आहेत. हॉस्पिटलमध्ये जे जास्तीचे दर आहेत ते त्यांनी आमच्यासाठी कमी केले आहेत.' 

राखीने एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. यामध्ये तिने सांगितलं होतं की, तिची आई दोन महिन्यांपासून रुग्णालयात दाखल आहे. राखीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचे चाहते भावूक झाले होते. दरम्यान, बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं देखील काही महिन्यांपूर्वी राखीला मदत केली होती.


सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीत ५० हजार मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT