Prajakta Mali Saam TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: मी प्रेमात पडते आणि मग...; प्राजक्ताच्या लव्ह स्टोरीचा 'हा' किस्सा कुणीच ऐकला नसेल

Prajakta Mali Love Story: प्रेमा विषयी तिचं काय मत आहे? असे काही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतात. अशात प्रजक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय.

Ruchika Jadhav

Actress Prajakta Mali:

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच तिच्या कामासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्राजक्ताच्या आयुष्यातील खासगी गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये फार उस्तुकता असते. ती शुटींगवर नसताना काय करते. ती रिलेशनशिपमध्ये आहे का? प्रेमाविषयी तिचं काय मत आहे? असे काही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतात. अशात प्रजक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात तिने स्वत: आपल्या आयुष्यातील लव्हस्टोरी बाबत माहिती दिलीये.

प्राजक्ता आतापर्यंत किती वेळा प्रेमात पडली? तिला एखाद्या मुलाला रिजेक्ट करायचं असेल तर ती काय करते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर प्राजक्ताने स्वत: यावर उत्तर दिलंय. तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे की, मी प्रेमात पडते... मग दोन दिवसांत मला समजतं की, नाही नाही हा शेवटपर्यंत नसणारे. मग मी त्याला सांगते हे बघ मित्रा अशा अशा गोष्टी आहेत. त्यामुळे आता तू आपल्या घरी जा, असं प्राजक्ताने म्हटलं आहे.

प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका माध्यम संस्थेला मुलाखत देतानाचा हा व्हिडीओ आहे. यातील ठरावीक भाग कट करून प्राजक्ताने स्वत: एक मिम्स बनवलाय. २ दिवसांच्या रिलेशनशिपनंतर सर्वच मुली असं करतात, असं प्राजक्ताने यावर लिहिलंय.

प्राजक्ताने स्वदेश या हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरूवात केली. साल २००४ पासून ती मनोरंजन विश्वात कमा करत आहे. मात्र २०१३ मध्ये तिला खरी ओळख मिळाली. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली. त्यानंतर २०१७ मध्ये नकटीच्या लग्नाला सावधान या मालिकेने तिला आणखी प्रसिद्धी मिळवून दिली. अलिकडेच तिची रानबाजार ही सिरीज चांगलीच चर्चेत आली होती. अशात सध्या अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या व्हिडीओची मोठी चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भवानीच्या दर्शनासाठी भाविकांची लूट; बोगस पुजारी आणि एजंटांचा भाविकांना गंडा

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला

कर्नाटकमध्ये मोठी राजकीय फेरबदल; काँग्रेसनं बदलला प्रदेशाध्यक्ष

Maharashtra News Live Update: - शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरेदी केंद्र नसलेल्या तालुक्यात नाफेड थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करणार

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या TMC मध्ये उभी फूट, एकाचवेळी ६० आमदारांची सोडचिठ्ठी

SCROLL FOR NEXT