Prajakta Mali Post For Samir Choughule Instagram
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Post For Samir Choughule: ‘जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूत…’ प्राजक्ताची समीर चौघुलेसाठी वाढदिवशी खास पोस्ट

Happy Birthday Samir Choughule: सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने विनोदवीर समीर चौघुलेला तिच्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Chetan Bodke

Prajakta Mali Wishes Samir Choughule On 50th Birthday: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील विनोदवीर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या समीर चौघुलेचा आज वाढदिवस. समीरने मराठी चित्रपटसृष्टीत लेखक, अभिनेता आणि विनोदवीर म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली. २९ जून १९७३ साली त्याचा मुंबईत जन्म झाला आहे.

समीर चौघुलेला सर्वाधिक प्रसिद्धी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून मिळाली आहे. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून तो शोमध्ये सक्रिय असून त्याने आतापर्यंत वेगवेगळे पात्र मालिकेत साकारले. नुकतंच त्याला अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच प्राजक्ताने खास पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राजक्ता माळीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेत होस्टिंगटचं काम केलं आहे, तर सोबतच या दोघांनी ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात काम देखील केले आहे. नुकतंच प्राजक्ताने खास समीर चौघुलेसाठी पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये प्राजक्ता म्हणते, “दुग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा ५० वा वाढदिवस आला… खरचं…, सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस… तूझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली…”

तिच्या पोस्टमध्ये प्राजक्ता पुढे म्हणते, “आणि मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले.. आणि ही ओळख आयुष्यभर राहील, असं वाटतं. तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस; तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश,प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो.., आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो; ह्याच तूला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! ” असं म्हणत प्राजक्ताने समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राजक्ता आणि समीर चौगुलेबद्दल बोलायचे तर, या दोघांमध्ये एक स्पेशल नातं देखील आहे. प्रेक्षकांनी अनेकदा यांच्यातील नाते कार्यक्रमामध्ये पाहिले आहे. कोणतेही स्किट असो, नेहमीच प्राजक्ता समीरच्या स्किटला ‘वाह दा वाह’ अशीच प्रत्येक स्किटला भरभरून दाद असते. प्राजक्ताची ही दाद प्रेक्षकांमध्ये इतकी प्रसिद्ध झाली की, अनेकजण कोणाचेही कौतुक करायचे ठरले, तर आपसूकच प्राजक्ताचं ते वाक्य तोंडात येतं.प्राजक्ताने केलेली ही वाढदिवसाची पोस्ट पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

SCROLL FOR NEXT