Noor Malabika Das News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Noor Malabika Das News : कलाकारांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, अभिनेत्रीच्या प्रकरणी मृत्यूप्रकरणी केली चौकशीची मागणी

Noor Malabika Das News : ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राच्या माध्यमातून नूरच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री काजोलची ‘द ट्रायल’ मधील सहकलाकार नूर मालाबिका दास हिचा गेल्या काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेला आहे. पूर्वी एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या नूर गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. ३७ वर्षीय अभिनेत्रीचा लोखंडवालामधील फ्लॅटमधून ६ जून रोजी ओशिवरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान तिच्या मृत्यूची बातमी पोलिसांनी नूरच्या मूळ गावी असलेल्या कुटुंबियांना यासंदर्भात माहिती आहे. एका एनजीओने रविवारी अभिनेत्रीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राच्या माध्यमातून नूरच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

पत्र लिहून ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नूर दास हिच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच या प्रकरणाचे सत्य समोर येईल आणि तिला न्याय मिळेल त्याप्रमाणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे पत्र स्वत: ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने त्यांच्या X अकाऊंटवर शेअर केले आहे.

“नूरचा अकाली मृत्यू हा इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील आत्महत्यांच्या ट्रेंडची आठवण करून देणारा आहे. बॉलिवूडमध्ये या प्रकारच्या दुःखद घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्या घटनेमागील मुळ कारणाचा पोलिसांनी सखोल तपास करणे आवश्य आहे.” असं असोसिएशनने लिहिलेल्या पत्रात नमुद करण्यात आलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Winter Lip Care: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPATचा वापर शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका | VIDEO

डॉक्टर महिलेसोबत अफेअरचा संशय, भावाकडून KEM रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने वार

SCROLL FOR NEXT