HBD Mumtaz Saam TV
मनोरंजन बातम्या

HBD Mumtaz : वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण, ज्युनिअर आर्टिस्ट ते टॉप अभिनेत्री; मुमताजचा थक्क करणारा फिल्मी प्रवास

Mumtaz Career : मुमताजला दारा सिंगच्या 'फौलाद' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पहिली संधी मिळाली.

Pooja Dange

Mumtaz Journey In Bollywood : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि दिग्गज अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री मुमताजला यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मुमताजने त्यांच्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आज म्हणजेच 31 जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचा वाढदिवस आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मुमताज यांनी सिनेप्रेमींच्या मनावर राज्य केले. अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी अभिनय विश्वात प्रवेश केला.

मुमताज चित्रपटसृष्टी यायच्या आधी तिच्या आई आणि काकी यांनीही चित्रपटांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले होता. सुरुवातीच्या काळात मुमताज यांना चित्रपटांमध्ये काही छोट्या भूमिका मिळाल्या. त्या काळात इंडस्ट्रीतील कोणत्याही अभिनेत्याला मुमताजसोबत काम करायचे नव्हते. बर्‍याच संघर्षानंतर मुमताजला दारा सिंगच्या 'फौलाद' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पहिली संधी मिळाली.

मुमताज आणि दारा सिंग यांची ऑन-स्क्रीन हिट ठरली. मात्र या चित्रपटानंतर मुमताज यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटानंतर तिने दारा सिंगसोबत 16 चित्रपट केले, त्यापैकी 12 बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

मुमताजने हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत काम केले, जे जोडी देखील हिट ठरली आणि त्यांचे चित्रपट देखिलप्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडले. या दोन्ही कलाकारांनी 'दो रास्ते', 'सच्चा-झूठा', 'आपकी कसम', 'दुश्मन', 'रोटी' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

एका मुलाखतीदरम्यान मुमताजने आपल्या यशाबद्दल सांगितले की, दारा सिंगचा तिची कारकीर्द पुढे नेण्यात मोठा हात आहे. हे श्रेय मुमताज यांनी दारा सिंगने देताना त्या म्हणाला होता की, त्यांच्यासोबत काम केल्यामुळे मला चांगले चित्रपट मिळाले.जेव्हा मी प्रसिद्ध झालो तेव्हा ज्या स्टार्सनी आधी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता, त्यांना माझ्यासोबत काम करायचे होते. यात शम्मी कपूर, संजीव कपूर, जितेंद्र आणि देवानंद यांच्या नावाचा समावेश आहे.

मुमताजचे लाखो चाहते होते. या चाहत्यांमध्ये राजेश खन्ना, शम्मी कपूर यांसारख्या अभिनेत्यांच्या देखील समावेश होता. अभिनेते शम्मी कपूर तिच्यावज जीवापाड प्रेम करत होते. शम्मी कपूर यांनी मुमताजशी लग्न करायचे होते. दोघे रिलेशशीपमध्ये देखील होते, असे म्हटले जाते. पण दोघांचे नाते लग्नापर्यंत जाऊ शकले नाही, कारण मुमताजने लग्नानंतर चित्रपटात काम करू नये अशी शम्मी कपूरची अट होती.

मात्र, मुमताज हे मान्य नव्हते, त्यामुळे त्यांचे नाते पुढे गेले नाही. यानंतर अभिनेत्रीने 1974 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती मयूर माधवानीसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या बातमीने सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासह अनेकांची हृदय तुटले. लग्नानंतर मुमताज पतीसोबत ब्रिटनमध्ये स्थायिक झाली.

आपल्या कारकिर्दीत मुमताजने तोय्या, रोटी, आंधी और तुफान, जवान मर्द, रुस्तमे हिंद आणि दो रास्ते यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. मुमताजला 'तोय्या' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT