Actress Janki Bodiwala Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janki Bodiwala: 'रोज शरीरावर जखमा व्हायच्या...'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला शूटिंग दरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार

Actress Janki Bodiwala: अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटातील अभिनेत्री जानकी बोडीवालाने स्वतःबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. ती जेव्हा जेव्हा सेटवरून घरी परतायची तेव्हा तिच्या शरीरावर अनेकदा जखमा दिसायच्या.

Shruti Vilas Kadam

Actress Janki Bodiwala: गुजराती चित्रपटसृष्टीतून प्रसिद्ध झालेली आणि बॉलिवूडमध्ये मोठ्या पडद्यावर आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री जानकी बोडीवाला सध्या सोशल मीडियावर फार फेमस होत आहे. "वश" चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी जानकीने अजय देवगणसोबत "शैतान" मध्ये तिचे अभिनय कौशल्य दाखवले आणि आता ती राणी मुखर्जीसोबत "मर्दानी ३" मध्ये एका दमदार भूमिकेत दिसली आहे. आता एका मुलाखतीत तिने तिच्या कामाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

जानकीने नवभारत टाईम्सशी खास संवाद साधला. मुलाखतीदरम्यान तिने तिच्या कामाबद्दल अनेक सिक्रेट सांगितली. तिने स्पष्ट केले की अभिनेत्री होण्याचे तिने कधीचं ठरवले नव्हते. ती डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करत होती. जानकी म्हणते, "माझ्या वडिलांना चित्रपटांची खूप आवड आहे. आमच्या घरी एक छोटे थिएटर आहे जिथे मी लहानपणापासूनच चित्रपट पाहत आहे. मी डॉक्टरीच्या पहिल्या वर्षात असताना, माझ्या वडिलांनी मला एका मित्राच्या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सांगितले. खरे सांगायचे तर, माझे ऑडिशन खूप सामान्य होते, परंतु दिग्दर्शक कृष्णदेव याज्ञिक यांनी मला शिकवले आणि माझा पहिला चित्रपट 'चेलो दिवस' सुपरहिट झाला. तिथून, मी माझा डॉक्टरीचा अभ्यास मागे सोडला आणि माझा अभिनय प्रवास सुरू झाला."

'शैतान' सारख्या चित्रपटात पुन्हा तीच भूमिका साकारणे जानकीसाठी खूप थकवणारे होते. तिने स्पष्ट केले की, "मला शूटिंग दरम्यान हे कळले नाही, पण मला एकदा आम्ही शूटिंग दरम्यान १०-१५ दिवसांचा ब्रेक मिळाला होता. हा ब्रेक मला नाही आवडला मला वाटलं सगळं नीट सुरु असताना ब्रेक का मिळाला पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मला खूप थकवा जाणवला तेव्हा कळलं ब्रेक महत्वाचा होता.

मी पूर्णपणे थकले होते, आणि फक्त प्री-क्लायमॅक्स शूट झाला होता, क्लायमॅक्स अजून यायचा होता. मग मला जाणवले की तो ब्रेक किती महत्वाचा होता. ब्रेक नसता मिळाला तर, मला वाटत नाही की मी क्लायमॅक्समध्ये तितक्याच एनर्जीने काम करू शकले असते. त्या भूमिकेने माझे शरीर पूर्णपणे थकवले होते. मला रोज कुठेतरी जखमी व्हायच्या आणि माझी आई घाबरायची आणि तिला मी नक्की काय करते असा प्रश्न पडायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूच्या अड्ड्यावर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण|VIDEO

Maharashtra Live News Update: व्ही एस आर कंपनीचे मालक व्हि के सिंग यांची सीआयडी कडून मागील सहा तासांपासून चौकशी सुरू

नागपुरात ढिवसाढवळ्या हत्येचा थरार; नवऱ्याने भर रस्त्यात बायकोच्या बॉयफ्रेंडला संपवलं

Fenugreek Water For Hair: मेथीच्या दाण्याच्या पाण्याने केस धुण्याचे फायदे काय?

Dog Behavior: रात्रीच्या वेळेस वाहन चालकांच्या मागे कुत्री का लागतात? हे सत्य वाचून व्हा सावध

SCROLL FOR NEXT