Janhvi Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor Health Update: अभिनेत्री जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल; अनेक दिवसांपासून होती आजारी

Janhvi Kapoor hospitalised: अभिनेत्री जान्हवी कपूरला रुग्णालयात दाखल केलं आहे.अनेक दिवसांपासून जान्हवी आजारी होती.

Vishal Gangurde

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आली समोर आली आहे. अभिनेत्री जान्हवीला अन्नातून विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केले आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ न लागल्याने तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले. जान्हवीला रुग्णालयात दाखल केल्याने चाहत्यांची हूरहूर वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीला गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. गुरुवारी तब्येत आणखी बिघडल्याने जान्हवीला तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. जान्हवीची तब्येत आता स्थिर आहे. तिला एक ते दोन दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

जान्हवीने काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नात सहभाग नोंदवला होता. ती बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत तिने लग्न सोहळ्यात एन्ट्री मारली होती. अभिनेत्री जान्हवी खूप मस्ती आणि डान्स करताना दिसली. जान्हवी आणि राधिका दोन्ही चांगल्या मैत्रिणी आहेत. एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे ती लग्नात सहभागी झाली होती. जान्हवीने तिचे अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. लग्नात जान्हवीसोहत शिखर देखील दिसला.

दरम्यान, जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल विषयी बोलायचं झालं तर जान्हवीच्या उलझ या सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे. जान्हवीच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना प्रचंड भावला आहे. या सिनेमातील जान्हवीच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. जान्हवीचा उलझ हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात जान्हवी नव्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमात जान्हवी ही शासकीय अधिकारीच्या रुपात पाहायला मिळणार आहे. तिचा उलझ सिनेमा २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

उलझ सिनेमात गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, मियांग चँग आणि आदिल हुसैन महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. जान्हवीचे लवकरच आणखी दोन सिनेमे येणार आहेत. एका सिनेमात ती ज्युनिअर एनटीआरसोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Maharashtra Live News Update: राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे

Fridge Cleaning : तुमच्या फ्रिजमधून दुर्गंध येतोय? तर वाचा हे सोपो घरगुती उपाय

'Bigg Boss 19'मध्ये शॉकिंग एलिमिनेशन; २ सदस्यांचा पत्ता कट, नीलमसोबत 'हा' स्ट्राँग सदस्य जाणार घराबाहेर

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? पुढील २४ तास महत्त्वाचे, सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT