Ulajh Poster Out Instagram
मनोरंजन बातम्या

Ulajh Posters Released : जान्हवी कपूर दिसणार IFS ऑफिसरच्या भूमिकेत, 'उलझ'चा नवा पोस्टर रिलीज

Janhvi Kapoor's Ulajh Posters Released : जान्हवी कपूरचा 'उलझ' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा नव्या पोस्टर रिलीज झालेले आहे. सध्या अभिनेत्रीच्या लूकचीही तुफान चर्चा होत आहे.

Rutuja Kadam

जान्हवी कपूरचा 'उलझ' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उलझ' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचं अनावरण करण्यात आले आहे. पोस्टरमधील आणि सिनेमातील भूमिकेच्या जान्हवीच्या लूकची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

उलझ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २ ऑगस्ट २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. जान्हवी कपूर एका तरुण मुत्सद्दी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या नवीन पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले आहे. हा सिनेमा ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रेक्षक आणि नेटकऱ्यांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

जान्हवी कपूर या सिनेमातून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचमुळे तिचा हा नवा लूक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, सचिन खेडेकर, राजेश तैलंग, मियांग चांग, आदिल हुसैन, राजेंद्र गुप्ता, जितेंद्र जोशी अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. देशभक्तीविषयची कथा या सिनेमातून उलघडणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. आणि तेव्हापासून जान्हवीच्या सिनेमाची चर्चा सुरु झाली. जान्हवी यामध्ये सुहाना नावाचं पात्र साकारणार आहे.

नुकताच पोस्टर रिलिज प्रदर्शित झालेला उलझ हा एक पॉलिटीकल थ्रिलर असणार आहे. यामध्ये हिंदी-मराठी कलाकर झळकणार आहेत. त्यामुळे कथेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परवेझ शेख आणि सुधांशू सरिया यांनी सिनेमाचं लेखन केले आहे. तर, अतिका ​​चौहान यांनी चित्रपटाचे डायलॉग लिहिले आहेत. सुधांशू सारिया यांनी दिग्दर्शनसुद्धा केले आहे. 2 ऑगस्ट रोजी या हा थिएटरमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट रिलिज झाला. त्यामुळे जान्हवी विविध धाटणीच्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसते आहे. कमी कालावधीतच तिने बॉलिवूडमध्ये नाव कमावले. 'धडक' या सिनेमामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मिली, गुडलक जेरी, गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, बवाल, मिस्टर अँड मिसेस माही असे अनेक सिनेमे केले. विषेष म्हणजे या सर्व भूमिका वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

SCROLL FOR NEXT