Hina Khan Post INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

Hina Khan : ''जेव्हा तुम्ही खाऊ शकत नाही..'' हिना खानने शेअर केली नव्या आजाराची पोस्ट

Actress Hina Khan Diagnosed With Mucositis : अभिनेत्री हिना खान ही ब्रेस्ट कॅन्सरसाठी उपचार घेत असतानाच तिला आता म्यूकोसिटिस नावाचा आजार झाला आहे. त्याबद्दल तिने आपल्या सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.

Saam Tv

Hina Khan Posted About Mucositis : 'ये रिश्ता क्या कहलाता हे' फेम अभिनेत्री हिना खानला (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर ती सध्या त्यावर उपचार घेत आहे. तिच्या केमोथेरपी सुरू असतानाच आता तिला आणखी एका आजाराने ग्रासले आहे. याबद्दल तिने नुकतीच आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली असून म्यूकोसिटिस नावाचा हा आजार असल्याचे तिने त्यात सांगितले आहे. तसेच याबद्दल कोणाला काही उपाय माहीत असल्यास तेही सांगण्याबद्दल तिने चाहत्यांना आवाहन केले आहे.

हिना तिच्या स्तनांच्या कर्करोगामुळे (Breast Cancer) ग्रस्त असल्याची माहिती तिने काही महिन्यांपूर्वी आपल्या चाहत्यांना दिली होती. या उपचारादरम्यान तिला आधी केस गळण्याचा त्रास झाला होता. त्याबद्दलही तिने आपल्या सोशल मिडियावरून वेळोवेळी माहिती दिली होती. आता केमोथेरपी सुरू असताना अभिनेत्री हिनाला म्यूकोसिटिस हा तोंडाचा आजार झाल्याचे निदान झाले आहे.

या आजारामुळे तिला जेवण करता येत नसल्याचे तिने आपल्या पोस्ट मधून सांगितले आहे. '' जेव्हा तुम्ही खाऊ शकत नाही..'' अशा कॅप्शन खाली तिने ही पोस्ट केली आहे. केमोथेरपीचा हा एक दुष्परिणाम असल्याचे तिने सांगितले आहे.

३६ वर्षीय हिना खान ही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सतत आपल्या चाहत्यांसोबत सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील चढ - उतारांबद्दलची माहिती ती कायम सांगत असते. तिच्या या नव्या आजाराच्या पोस्टने तिच्या चाहत्यांची चिंता अधिक वाढली आहे.

हिनाने पोस्ट मध्ये काय लिहिले आहे ?

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टद्वारे लोकांना उपयुक्त उपायांबद्दल विचारले आहे. हिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, '' म्यूकोसिटिस हा केमोथेरपीचा आणखी एक परिणाम आहे. आपण काही खाऊच शकत नाही ही फार कठीण आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहे. तुमच्यापैकी कोणी यातून गेले असेल किंवा उपयुक्त उपाय माहीत असेल, तर कृपया सुचवा. मला खूप मदत होईल.''

म्यूकोसिटिस नेमका काय आहे?

म्यूकोसिटिस (Mucositis) हा आजार अनेकदा केमोथेरपीनंतर रुग्णाला होतो. यामुळे तोंडात दुखणे, फोड येणे आणि सूज येणे यासह अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे काही खाण्यास अथवा जेवण करण्यात रुग्णाला अडचणी येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT