Famous Actress Saam tv
मनोरंजन बातम्या

Shocking : २८ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक; धक्कादायक कारण समोर

Famous Actress arrested by police : कोलकाता पोलिसांनी २८ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक केली. ती वर्षभरापासून बेकायदेशीररित्या भारतात राहत होती.

Vishal Gangurde

कोलकाता पोलिसांनी बुधवारी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका बांगलादेशी अभिनेत्री आणि मॉडेलला अटक केली आहे. या अभिनेत्रीकडे भारताचं आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड सारखे बोगस कागदपत्रे आढळले. शांता पाल असे २८ वर्षीय बांगलादेशी अभिनेत्रीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांता पाल ही जावदपूर भागातील गोल्फग्रीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होती. तिच्याजवळ बांगलादेशातील अनेक कागदपत्रे आढळले. शांताजवळ बांगलादेशी पासपोर्ट, ढाकातील परीक्षेचं अॅडमिट कार्ड, ओळखपत्र आढळले. त्यानंतर पोलिसांनी सर्व कागदपत्रे जप्त केली.

प्राथमिक माहितीनुसार, शांता पाल ही गेल्या वर्षभरापासून कोलकातामध्ये भाडेतत्वावर घर घेऊन राहत होती. तिच्यासोबत एक तरुण देखील राहत होता. त्या तरुणाचाही तपास सुरु करण्यात आला आहे.

पोलिसांनी आज शांता पालला कोर्टात हजर केलं. त्यानंतर तिला कोर्टाने ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोलकाता पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे बांगलादेशी अभिनेत्रीवर गुन्हा नोंदवण्यात आला. तपासानंतर पोलिसांकडून अभिनेत्रीला अटक करण्यात आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शांताजवळील पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपली होती. ती २०२३ साली व्हिसावर भारतात आली होती. परंतु तिचा व्हिसा आणि पासपोर्टचा अवधी दोन वर्षांपूर्वी संपुष्टात आला. त्यानंतरही शांता भारतात बेकायदेशीररित्या मुक्काम करत होती. तिने भारतात बोगस कागदपत्रे तयार केले होते.

शांताकडे आढळलेल्या आधारकार्डावर एका कोलकाता आणि दुसरा बर्धमान येथील पत्ता होता. शांता बांगलादेशात अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिने अनेक टीव्ही चॅनल आणि कार्यक्रमात अँकरिंग केली आहे. तिने बांगलादेशात सौंदर्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे आणि काही स्पर्धांमध्ये ती विजेतीही ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT