Anjali Anand Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anjali Anand: मी तुझ्या वडिलांसारखाच...; आधी धीर दिला, नंतर डान्स टीचरकडून 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा शारीरिक छळ

Actress Anjali Anand: डब्बा कार्टेल अभिनेत्री अंजली आनंदने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत ती ८ वर्षांची असताना तिच्या डान्स टीचरने तिचा कसा छळ केला असल्याचा धक्कादायक खुलासा केला.

Shruti Vilas Kadam

Actress Anjali Anand: नेटफ्लिक्सवरील डब्बा कार्टेल या मालिकेत दिसलेली अभिनेत्री अंजली आनंदने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. तिने सांगितले की तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या डान्स टीचरने तिच्याशी वाईट वर्तन केले होते. जेव्हा अंजली ८ वर्षांची होती, तेव्हा तिच्या डान्स टीचरने तिच्या ओठांवर किस घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्या मित्राने तिला वाचवले.

डान्स टीचरने अंजलीसोबत केले घाणेरडे कृत्य

हॉटरफ्लायला दिलेल्या एका खास मुलाखतीत, अंजली आनंदने बालपणीचा एक प्रसंग सांगितला, "मला काय करावे हे कळत नव्हते. मी आठ वर्षांची होते, माझे वडील गेल्यानंतर, त्यांनी मला सांगितले की मी तुझ्या वडिलांसारखा आहे आणि मी तुझी काळजी घेईन. हळू हळू त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने हात लावायला सुरु केले. त्यांनी माझ्या ओठांवर किस केले आणि म्हणाले की वडील असेच करतात."

अंजली म्हणाली, "तो मला माझे केस मोकळे सोडू देत नव्हता, तो मला मुलीसारखे कपडे घालू देत नव्हता, तो मला त्याचे जुने टी-शर्ट घालायला लावत होता जेणेकरून मी इतरांना चांगली दिसू नये. जेव्हा माझ्या बहिणीचे लग्न झाले आणि माझ्या वडिलांच्या जवळच्या मित्राचा मुलगा लग्नाला आला तेव्हा तो माझ्याशी बोलू लागला त्यावेळी त्याला हा पारेकर समजला.

प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले

अंजली पुढे म्हणाली की सुरुवातीला तिला सर्व काही सामान्य वाटत होते, पण नंतर तिला कळले की या गोष्टी चुकीच्या असतात. तो माझ्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवायचा. मी कोणाला कोणते मेसेज पाठवत आहे हे त्याला माहीत होते. तो मला घेण्यासाठी माझ्या शाळेबाहेर वाट पाहत असे आणि सगळे विचार करायचे, 'तो नेहमीच तिथे का असतो?' पण कोणीही का ते शोधण्याचा प्रयत्नही केला नाही.

अंजलीने सांगितले की, हे सर्व तिच्यासोबत १४ वर्षांची होईपर्यंत या गोष्टी घडत होत्या आणि त्यावेळी तिला समजावून सांगणार किंवा काय चुकीचं काय सांगणार कोणी नव्हतं. या गोष्टी तिच्या मित्राला जेव्हा कळल्या तेव्हा त्याने तिला समजावून तिची सुटका केल्याचे तिने सांगितले आणि यासाठी त्याचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

Abhishek Sharma : १० षटकार, १० चौकार अन् २०० चा स्ट्राईक रेट; अभिषेकच्या शतकी तडाख्यात दिल्ली उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT