Jaya Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan : 'ते अभिनय करत आहेत...', जया बच्चन यांनी जखमी भाजप खासदारांविषयी केलं मोठं वक्तव्य

Jaya Bachchan : ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी गुरुवारी संसदेत झालेल्या धक्का प्रकरणात जखमी भाजप खासदारांना अभिनय पुरस्कार द्यावी अशी टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jaya Bachchan : दिल्लीतील रुग्णालयात उपचार घेत असलेले भाजपचे खासदार 'नाटक' करत असल्याचा गंभीर आरोप समाजवादी पक्षाच्या (एसपी) खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी शुक्रवारी केला तसेच या जखमी खासदारांना अभिनयाचा पुरस्कार दिला जावा, असे ही त्या पुढे म्हणाल्या. विरोधी पक्षांनी काढलेल्या निषेध मोर्चादरम्यान पत्रकारांशी बोलताना राज्यसभा सदस्या जया बच्चन यांनी दावा केला की, आजपर्यंतच्या त्यांच्या अभिनेत्री त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी, मुकेश राजपूत आणि एस. फांगनोन कोन्याक यांच्यापेक्षा चांगले कलाकार कधीच पाहिला नाही.

काय होते प्रकरण

संसदेच्या संकुलात झालेल्या 'धक्का' प्रकरणी गुरुवारी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींविरोधात एफआयआर नोंदवला होता. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कथित अपमान केल्याप्रकरणी गुरुवारी संसद भवनाच्या मकर द्वारजवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य एकमेकांसमोर आले आणि घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्ष आणि एनडीएच्या खासदारांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी मंत्री प्रतापचंद्र सारंगी आणि लोकसभा सदस्य मुकेश राजपूत जखमी झाले.

'एवढा उत्तम अभिनय मी कधीच पाहिला नाही'

या प्रकरणाशी संबंधित प्रश्नावर जया बच्चन यांनी आरोप केला की, 'सारंगी जी नाटक करत आहेत... मी माझ्या कारकिर्दीत (अभिनेत्री म्हणून) राजपूत जी, सारंगी जी आणि नागालँडच्या महिला (एमपी) यांच्यापेक्षा चांगला अभिनय कधीच पाहिला नाही. त्यांनी उत्तम अभिनय केला. या अभिनयासाठी त्यांना पुरस्कार दिले पाहिजे.' त्यापुढे म्हणाल्या, 'राजपूत जी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये होते. प्रथम एक छोटी पट्टी लावली. मग मोठी पट्टी लावली. त्यानंतर ते आयसीयूमध्ये आपल्या नेत्याशी बोलत होते. असा दमदार अभिनय मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही.

'हे त्यांचे वास्तव आहे...'

सपा खासदाराच्या टिप्पणीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले, 'हीच समाजवादी पक्ष आणि 'इंडी' युतीची खरी संस्कृती आहे. ते आदिवासी आणि महिलांचा अपमान करतात. ही त्यांची ओळख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT