Actress Puja Banerjee and Actor Kunal Verma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fraud: सेव्हिंग लुबाडली; घरही विकावं लागलं अन्...; प्रसिद्ध टिव्ही कपलची फसवणूक; मित्रानंच घात केला, व्हिडीओतून सांगितली व्यथा

Actress Puja Banerjee and Actor Kunal Verma: 'देवों के देव... महादेव' या मालिकेत 'देवी पार्वती'ची भूमिका साकारणाऱ्या पूजा बॅनर्जीने तिचा पती आणि अभिनेता कुणाल वर्माने त्यांनी आर्थिक फसवणूकीची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला.

Shruti Vilas Kadam

Actress Puja Banerjee and Ator Kunal Verma: 'देवों के देव... महादेव' या मालिकेत 'देवी पार्वती'ची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली पूजा बॅनर्जी बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. अलीकडेच, तिने तिचा पती आणि अभिनेता कुणाल वर्माने सोबत एक व्हिडिओ शेअर केला, या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की त्यांच्यासोबत एक मोठी फसवणूक झाली आहे, यामुळे या कपलने त्यांची सर्व सेव्हिंग गमावली आहे. पूजा बॅनर्जीने सांगितले की त्यांच्या एका जवळच्या मित्राने त्यांची फसवणूक केली आहे. या नुकसानामुळे पूजा आणि कुणाल पूर्णपणे तुटले आहेत.

आम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागेल...

व्हिडिओमध्ये पूजा बॅनर्जी म्हणाली, 'गेले दोन-तीन महिने आमच्यासाठी खूप कठीण होते. पुढे काय होईल हे आम्हाला समजत नव्हते. आमची पैशांची फसवणूक झाली आहे. यामध्ये, आम्ही खूप मोठी रक्कम गमावली आहे, आता पुन्हा एकदा आम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागेल. आम्हाला हार मानायची नाही, परंतु या फसवणुकीत आम्ही आमची सर्व बचत गमावली आहे. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की कृपया आम्हाला पाठिंबा द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. आमचा देवावर पूर्ण विश्वास आहे.'

कुणाल-पूजा यांच्या मित्राने विश्वासघात केला!

पूजा म्हणाली की या घटनेमुळे तिचा पती कुणाल खूप मानसिक त्रास झाला आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि पुन्हा आयुष्य सुरू करण्यासाठी तो प्रेक्षकांवर अवलंबून आहे. या दरम्यान, अभिनेत्रीने तिला फसवणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड केली नाही, परंतु तिने सांगितले की त्यांच्या जवळच्या मैत्रिणीने त्यांना फसवले होते.

पूजा आणि कुणाल पुढे म्हणाले, 'आम्ही अजूनही आतून तुटलेले आहोत. पण, आम्ही हार मानण्याचा प्रयत्न करत नाही. जर आम्ही जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे काही चूक केली असेल तर मी देवाकडे क्षमा मागितली आहे. आम्ही खूप रडलो आहोत. इतक्या दिवसांत आम्ही वेडे झालो होतो. आता आम्हाला रडायचे नाही, म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. कारण असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही तुमचे दुःख शेअर करता तेव्हा दुःख कमी होते. म्हणून जर तुम्ही लोक हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया आम्हाला पाठिंबा द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जबरदस्ती शारीरिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात; इरफाननं ओळख लपवून तरूणींना फसवलं

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Bigg Boss 19: प्रणित मोरेने अभिषेक बजाजच्या स्वप्नाचा केला चक्काचूर; सांगितलं अशनूर कौरला का केलं सेफ

Government Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची संधी; २९० पदांसाठी भरती; पगार मिळणार १,७७,५००; आजच करा अर्ज

Liver Infection: शरीराच्या या भागात वेदना होत असेल तर समजा लिव्हर खराब झालंय; इन्फेक्शनचे असतात हे संकेत

SCROLL FOR NEXT