Shruti Kadam
मेकअप दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि वॉटरप्रूफ बनवण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचा प्रायमर वापरा. यामुळे त्वचेवर मेकअप नीट बसतो.
नेहमी वॉटरप्रूफ किंवा लॉंग-वेअर फाउंडेशनचा वापर करा. हलकं पण टिकाऊ फाउंडेशन तुमचं लूक खराब होऊ देत नाही.
कंसीलर लावल्यानंतर त्यावर ट्रान्सलुसंट सेटिंग पावडर लावा. हे तेलकटपणा कमी करून मेकअपला फिक्स करतं.
पावडर ऐवजी क्रीम बेस्ड ब्लश, हायलायटर किंवा ब्रॉन्झर वापरा. हे त्वचेवर चांगले टिकतात आणि पाणी लागताच निघत नाहीत.
डोळ्यांसाठी विशेषतः वॉटरप्रूफ आयलाइनर आणि मस्कारा वापरावा. यामुळे पाणी, घाम किंवा अश्रूंनी मेकअप खराब होत नाही.
लिक्विड मॅट किंवा लॉंग-लास्टिंग लिपस्टिक वापरा आणि त्यावर थोडंसे टिश्यू ठेवून पावडर लावा. यामुळे लिपस्टिक वॉटरप्रूफ होते.
शेवटी मेकअप पूर्ण झाल्यानंतर वॉटरप्रूफ सेटिंग स्प्रे वापरून संपूर्ण मेकअप सेट करा. यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकतो आणि ओलसरपणापासून सुरक्षित राहतो.
Hair Smoothening Mask: स्मूद आणि सिल्की केसांसाठी 'हा' घरगुती हेअसमास्क लावा आणि आठवड्यात मिळवा चमकदार सॉफ्ट केस