Shruti Kadam
दही केसांना नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते, तर मध केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवतो. हे एकत्र करून लावल्यास कोरडे आणि कुरकुरीत केस मऊ आणि चमकदार होतात.
पिकलेले केळे आणि थोडेसे खोबरेल तेल एकत्र करून केसांना लावल्यास केस गुळगुळीत आणि पोषणयुक्त होतात. हे मास्क फ्रीझी केसांवर प्रभावी आहे.
मेथी दाणे भिजवून पेस्ट करून त्यात दही मिसळावे. हे केसांना लावल्याने केस मऊ होतात आणि कोंडा कमी होतो
अंड्यातील प्रथिने आणि ऑलिव्ह ऑइलमधील पोषणतत्त्वे केसांना मजबुती आणि गुळगुळीतपणा देतात. हे मास्क कोरड्या व क्षतिग्रस्त केसांसाठी उत्तम आहे.
अॅलोवेरामध्ये केसांना मऊ आणि थंडावा देणारी तत्त्वे असतात. नारळ तेलासोबत वापरल्यास हे मास्क केसांना डीप कंडिशनिंग प्रदान करतो.
दूधामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड केस स्वच्छ करते आणि मध ओलावा पुरवतो. हे मास्क केसांना मऊ, रेशमी बनवतो.
हिबिस्कस पानांचे पेस्ट आणि दही यांचा मिश्रण केसांवर लावल्यास केस गळती कमी होते आणि केस मऊ व सशक्त बनतात.