Sunny Deol : अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित चित्रपट रामायण विषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. रामायण या चित्रपटासंदर्भात दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी महिनाभरापूर्वी एक पोस्टर शेअर केले की ज्यामध्ये बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाचे दोन भाग असल्याचे स्पष्ट झाले. आता, या चित्रपटाविषयी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रामायण या चित्रपटात अभिनेता सनी देओल, जो या चित्रपटाचा भाग होणार असल्याची चर्चा रंगली होती त्याला आता दुजोरा मिळाला आहे.
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सनीने पुष्टी केली की निर्माते 'रामायण' हा चित्रपट हॉलीवूडमधील 'अवतार' आणि 'प्लॅनेट ऑफ द एप्स' प्रमाणेच भव्य बनवण्याचा विचार करत आहेत. त्यासाठी लेखक आणि दिग्दर्शक हा चित्रपट कसा असावा, त्यातील पात्र कसे सादर केले पाहिजेत याबद्दल अगदी स्पष्ट आहेत.
प्रभास आणि क्रिती सॅनन अभिनीत ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सारख्या अलीकडील प्रदर्शित झालेल्या बिग-बजेट चित्रपटातील सबपार व्हिज्युअल इफेक्ट्समुळे प्रेक्षक या चित्रपटासाठी देखील साशंक आहेत. म्हणूनच त्यांचं निराकरण करताना सनीने प्रेक्षकांना आश्वासन देत म्हणाला, नितेशचा प्रकल्प प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करणारा असा सुंदर अनुभव असेल. या चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स अस्सल वाटतील, ज्यामुळे पडद्यावर घडलेल्या घटना खऱ्याखुऱ्या वाटतील. "मला खात्री आहे की हा चित्रपट प्रत्येकाला आवडेल.
रामायण या चित्रपटात सनी हनुमानाची भमिका साकारणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, सनीने अजून त्याच्या भूमिकेबद्दल सांगण्यास टाळले आहे. तसेच, रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये, अभिनेता रणबीरने खुलासा केला की 'रामायण भाग १' चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे, लवकरच भाग २ चे शूटिंग सुरू करण्याची योजना आहे. रामाचे पात्र साकारण्याची संधी मिळाली याबद्दल रणबीरने यावेळी कृतज्ञता व्यक्त करत हा त्याचा ड्रीम रोल असल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.