Eknath Shinde And Sonu sood
Eknath Shinde And Sonu sood  Saam Tv
मनोरंजन बातम्या

राज्यात नवीन फडणवीस-शिंदे सरकार; अभिनेता सोनू सूदने व्यक्त केली मोठी अपेक्षा

साम टिव्ही ब्युरो

मोबीन खान

शिर्डी : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. ५० बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तसेच काल देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर राजकीय, सिनेसृष्टीतील अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यावर अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) देखील शूभेच्छा दिल्या. शिंदे सरकार महाराष्ट्रातील जनतेला न्याय देईल, अशी अपेक्षा सोनू सूदने व्यक्त केली आहे. ( Sonu sood news In Marathi )

अभिनेता सोनू सूद याने आज शिर्डीत येऊन साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलतांना सोनू सूदने शिंदे सरकारवर देखील भाष्य केलं. सोनू सूद म्हणाला, 'आपण शिर्डीत मोठ्या स्वरुपात सामाजिक कार्य हाती घेण्याचा मानस केला आहे. त्याची सुरुवात साईबाबांच्या शिर्डीतून करत आहे. शिर्डी शहरात अनाथआश्रम , वृद्धाश्रम तसेच शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक संस्था सुरु करणार आहे.

तसेच सध्याच्या राजकीय बदलावर बोलताना नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या असून नवीन सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्वसामान्य घटकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

धनंजय मुंडे मध्यरात्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेत आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, फडणवीस पुन्हा सत्तेत येताच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मध्यरात्री ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अचानक धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे 'हा' होममेड हेअर मास्क

Ankita Lokhande: व्हायचं होतं हवाईसुंदरी, पण झाली अभिनेत्री

Bobby Deol: सुलतान बनत बॉबी देओलने दाखवला दम; 'हरि हर वीरा मल्लू' चा टीझर रिलीज

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेविषयी पसरल्या होत्या 'या' अफवा, शेवटी तथ्य समोर आलंच!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा केजरीवाल होईल; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

SCROLL FOR NEXT