Aryan Khan : शाहरुखचा मुलगा आर्यन खान पुन्हा चर्चेत; 'या' कारणासाठी कोर्टात धाव

Cordelia cruise drugs case: न्यायालयाने याप्रकरणी एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १३ जुलैची तारीख निश्चित केली आहे.
Aryan Khan moves the court to release his passport
Aryan Khan moves the court to release his passportSaam Tv

मुंबई: कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स केस प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याची नुकतीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. (NCB) अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खान बरेच दिवस प्रसिद्धीझोतात नव्हता. मात्र, आता आर्यन खान पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने कोर्टात दाखल केलेली याचिका. आर्यन खानने आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी गुरुवारी विशेष एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल करत आपला पासपोर्ट परत करण्याची विनंती केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १३ जुलैची तारीख निश्चित केली आहे. (Aryan Khan Latest News)

हे देखील पाहा -

गेल्या वर्षीच्या क्रूझ ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून आर्यन खानला ऑक्टोबरच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती. परंतु तपास संस्थेने मे महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव दिले नाही. NCB ने आर्यन खान आणि इतर पाच जणांना "पुरेशा पुराव्याअभावी" सोडून दिले होते. आर्यन खानने जामीनाच्या अटींवर कोर्टात पासपोर्ट जमा केला होता. आता याप्रकरणात क्लिन चिट मिळाल्यानंतर गुरुवारी त्याने आपल्या वकिलांमार्फत विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला असून, दोषारोपपत्रात त्याच्या नावाचा उल्लेख नसल्याने आपला पासपोर्ट परत करवा अशी मागणी केली आहे.

२४ वर्षीय आर्यनला NCB ने गेल्या वर्षी ३ ऑक्‍टोबरला मुंबई किनार्‍याहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकून अटक केली होती. मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर करण्यापूर्वी आर्यन खानने 20 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात काढला होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यासाठी कोर्टानं अवधी वाढवून दिला होता. हा जवळपास दोन महिन्यांचा कालावधी संपला. त्यानंतर एनसीबीने या प्रकरणात कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. हे दोषारोपपत्र जवळपास ६ हजार पानांचे असून, त्यात आर्यन खानसह सहा जणांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्यात अविन साहू, गोपाल आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा, मानव सिंघल यांचा समावेश आहे.

Aryan Khan moves the court to release his passport
Sharad Pawar : नवं सरकार सत्तेत येताच शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

दरम्यान, कोर्टाने दिलेला ६० दिवसांचा अवधी संपल्यानंतर एनसीबीने विशेष कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला आरोपी करण्यात आले नाही. आर्यन आणि मोहक यांच्याकडे ड्रग्ज आढळले नाहीत. इतर सर्व आरोपींकडे ड्रग्ज सापडले आहेत. एनसीबीच्या माहितीनुसार, इतर १४ आरोपींविरोधात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आर्यन खानसह ६ जणांविरोधात सबळ पुराव्यांअभावी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com