TBMAUJ Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

शाहिद- क्रितीच्या 'Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya' ला व्हॅलेंटाईन विकचा जबरदस्त फायदा, पहिल्या आठवड्यामध्ये केली इतकी कमाई

Kriti Sanon And Shahid Kapoor Movie Collection: अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये उत्तम कमाई करताना दिसत आहे.

Chetan Bodke

TBMAUJ 7th Day Box Office Collection

क्रिती सेनन आणि शाहिद कपूरच्या (Kriti Sanon And Shahid Kapoor) ‘तेरी बातों मै ऐसा उल्झा जियां’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करीत आहे. रोबोट आणि वैज्ञानिकाची लव्हस्टोरी असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ९ फेब्रुवारीला रिलीज झालेला आहे.

चित्रपटाला फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये उत्तम कमाई करताना दिसत आहे. व्हॅलेंटाईन विकमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. (Bollywood Film)

चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये ४४.६३ कोटींची कमाई केली आहे. सातव्या दिवशी ३.२५ कोटींची कमाई केली असून प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच ट्रेड ॲनालिस्ट सॅकल्निकने चित्रपटाच्या कमाईबद्दलचा आकडा शेअर केला आहे. एका आठवड्यामध्ये जगभरामध्ये चित्रपटाने ८० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. (Bollywood News)

अमित जोशी आणि आराधना साह दिग्दर्शित चित्रपट सध्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत असून प्रेक्षक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहे. शाहिद आणि क्रितीसाठी हा चित्रपट खास ठरला आहे. कारण त्यांचे आधीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत. (Bollywood Actor)

चित्रपटामध्ये क्रिती सेनन एका सिफ्रा नावाच्या रोबोटच्या भुमिकेत तर शाहिद कपूर एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत आहे. एका वैज्ञानिकाची आणि रोबोटच्या लव्हस्टोरीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ही अनोखी कथा असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. (Bollywood Actress)

दरम्यान, मॅडॉक फिल्मने चित्रपटाची निर्मिती केली आहे. ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील असणार आहे. त्याच्यासोबत डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. चित्रपटातील डायलॉगसोबतच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

Crime News : दुचाकीवरून आले, तरुणीला उचलून नेलं अन्...; धक्कादायक कारण आलं समोर, घटनेचा VIDEO व्हायरल

लालपरीतून ओलाचिंब प्रवास; बसमध्येच पावसाचं पाणी गळायला लागल्याने चालकावर प्रवाशांने धरली छत्री

Tariff: वस्त्रोद्योग, हिरे, दागिने अन् बरंच काही; टॅरिफचा भारताला बसणार फटका; या क्षेत्रांवर होणार परिणाम

Liver Kidney Detox : यकृत अन् मूत्रपिंड डिटॉक्स करायचेय? ८ फळांचा रोजच्या आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT