Shah Rukh Khan Discharged : किंग खान इज बॅक, शाहरूख खानच्या तब्येतीत सुधारणा; IPL फायनल पाहण्यासाठी मैदानात जाणार का ?
Shah Rukh Khan Discharged Saam tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan : किंग खान इज बॅक, शाहरूख खानच्या तब्येतीत सुधारणा; IPL फायनल पाहण्यासाठी मैदानात जाणार का ?

Chetan Bodke

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याला डिहायड्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उन्हाचा त्रास होत असल्यामुळे अभिनेत्याला अहमदाबादमधील के.डी.रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. अभिनेत्याला रुग्णालयामध्ये दाखल केल्यामुळे चाहते चिंतेत आले होते. सोशल मीडियासह सर्वत्र त्याच्या तब्येत सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते. अशातच अभिनेत्याची हेल्थ अपडेट समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची तब्येत स्थिर असून लवकरच शाहरूखला डिस्चार्ज मिळणार आहे.

२१ मे २०२४ ला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होता. आपल्या टीमला चिअर करण्यासाठी अभिनेता खास स्टेडियममध्ये पोहोचला होता. वाढत्या तापमानाचा अभिनेत्यालाही प्रचंड त्रास झाल्यामुळे त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अभिनेत्याला काल दुपारी रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. आता अभिनेत्याची तब्येत व्यवस्थित असून लवकरच त्याला डिस्चार्ज मिळणार आहे.

शाहरुखच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत हेल्थ बुलेटिन जाहीर केलेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, त्याला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आहे. IPL 2024 चा पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. हा सामना केकेआरने जिंकला असून चौथ्यांदा ही टीम फायनलमध्ये पोहोचली आहे. आता फायनलसाठी किंग खान क्रिकेटर्सना चिअर करण्यासाठी मैदानात येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

वजन वाढवायचंय? असं एका महिन्यात वाढवा तुमचं Weight

Mumbai Rain: ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

SCROLL FOR NEXT