Sankarshan Karhade Instagram @sankarshankarhade
मनोरंजन बातम्या

Sankarshan Karhade: संकर्षणने दिली आनंदाची बातमी; फॅन्ससह कलाकारांनीही दिल्या शुभेच्छा

Sankarshan Karhade Post: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संकर्षणने शेअर केला त्याच्या आनंद.

Pooja Dange

Sankarshan Karhade Received Award: 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या शोच्या माध्यमातून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची महाराष्ट्राला ओळख झाली. या शोनंतर संकर्षणने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले. अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या भेटीला येतो.

संकर्षण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याच्या कमाविषयीची प्रत्येक अपडेट आणि जीवनातही काही क्षण तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतीच संकर्षणने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट करत संकर्षण त्याच्या जीवनातील एक आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

संकर्षणने त्याच्या पोस्टमध्ये त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हातामध्ये पुरस्कार आहे. हा पुरस्कार त्याला कशासाठी दिला आहे हे त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. 'आनंदाची बातमी शेअर करतो... लोकसत्ताचा “तरुण तेजांकित” पुरस्कार काल मला मिळाला... कला क्षेत्रात निवेदन, लिखाण, दिग्दर्शन, काव्य, गायन, अभिनय... अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रभावीपणे केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला...

खूप आनंद झाला मला... आपण करतोय त्या सगळ्या कामांवर महाराष्टातल्या वृत्तपत्राची बारीक नजर आहे हे खूप आनंद देणारं, जबाबदारी वाढवणारं आहे... मनापासून आभार... तुम्हा प्रेक्षकांच्या वतीने मी हे स्वीकारतो.. खूप शुभेच्छा द्या... कायम पाठीशी रहा... #thankyou' असे कॅप्शन संकर्षणने त्याच्या पोस्टला दिले आहे. त्याच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे.

सध्या संकर्षणचे 'नियम व अटी लागू' हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. या नाटकाचे निर्माते प्रशांत दामले आहेत. तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. खुद्द संकर्षणने हे नाटक लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naigaon BDD Project : 'बीडीडी'वासींच्या गृहप्रवेशाला मुहूर्त मिळाला, म्हाडाच्या घराच्या चाव्या या दिवशी मिळणार, वाचा...

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT