Salman Khan Galaxy Apartment Case Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan News : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला राजस्थानमधून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Salman Khan Galaxy Apartment Case Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणानंतर बिष्णोई गँगकडून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी घरावर १४ एप्रिलला दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एका आरोपीला अटक केलेली आहे. या आरोपीने अभिनेत्याला युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करून सलमानला मारण्याची धमकी दिली होती. या आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे.

अभिनेत्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर त्याला बिष्णोई गँगशी संबंधित व्यक्तीने व्हिडिओ युट्युबवर पोस्ट करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने अभिनेत्याला बिश्नोई गॅंगच्या नावाने धमकी दिली होती. या आरोपाखाली त्याला मुंबईच्या सायबर पोलीस स्थानकात ५०६ (२) भादवी कलमांसह ६६ (ड) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचं नाव बनवारीलाल गुजर असं असून आरोपीला राजस्थानवरून अटक केली आहे. गुज्जरला आता मुंबईत आणलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

१४ एप्रिल रोजी पहाटे दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर बाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत चार ते पाच आरोपींना अटक केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

Todays Horoscope: आज रक्षाबंधन असून आर्थिक निर्णय मार्गी लागतील; वाचा आजचं राशीभविष्य

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

SCROLL FOR NEXT