Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, संभाजीनगरमधून बिश्नोई गँगच्या एकाला अटक

Bishnoi Gang News: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. अटक केलेली व्यक्ती बिश्नोई गँगशी संबंधित असल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Bishnoi Gang News: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, संभाजीनगरमधून बिश्नोई गँगच्या एकाला अटक
Salman Khan Home Fire CaseSaam Tv

माधव सावरगावे, संभाजीनगर

देशामध्ये दहशत पसरवणाऱ्या बिश्नोई गँगचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) कनेक्शन समोर आले आहे. बिश्नोई गँगसाठी रेकी करणे, शस्त्रांची डिलिंग करणे याप्रकरणी संभाजीनगरमधून एकाला अटक करण्यात आली आहे. बिश्नोई गँगसाठी (Bishnoi Gang) वसीम चिकना हे काम करत असल्याची माहिती मिळताच पनवेल पोलिसांनी त्याला अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. वसीम जालना जिल्ह्यातील असून यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचे बिष्णोई गँग कनेक्शन उघड झाले आहे.

प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण, खंडणी, हत्या यासह बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Bollywood Actor Salman Khan) जीव मारण्याची धमकी देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँग देशभरात वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत असते. या बिश्नोई गँगची देशभरामध्ये मोठी दहशत आहे. याच बिश्नोई गँगचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन आता समोर आले आहे.

Bishnoi Gang News: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, संभाजीनगरमधून बिश्नोई गँगच्या एकाला अटक
Pune News: 'आम्ही वस्तीतील भाई' म्हणत तरुणांकडून परिसरात दहशत; दगड, विटांनी वाहनांची केली तोडफोड, CCTV समोर

लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी रेकी करणे , शस्त्रांच्या बिलिंगचे काम छत्रपती संभाजीनगर येथील वसीम मोहम्मद उर्फ वसीम चिकना हा करत होता. पनवेल पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी त्याला अटक केली आहे. सलमान खानच्या घरावर रेकी करण्यासाठी त्या परिसरामध्ये रूम शोधण्यासाठी वसीम चिकना सांगत होता अशी माहिती सूत्रांच्या आधारे पोलिसांना मिळाली आहे.

Bishnoi Gang News: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, संभाजीनगरमधून बिश्नोई गँगच्या एकाला अटक
Navi Mumbai Crime: संतापजनक! निर्दयी बापाने ५ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटलं; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर शहरातील जालानगर परिसरातील अलंकार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद उर्फ वसीम चिकनाला पनवेल पोलिसांनी नुकताच अटक केली. सलमान खान धमकी प्रकरणी आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली असता वसीम चिकनाचे नाव समोर आले होते.

या प्रकरणी पनवेल पोलिसांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी संपर्क साधून क्रांती चौक पोलिसांच्या मदतीने जालानगर परिसरामध्ये राहणाऱ्या वसीम चिकनाला अटक केली. सध्या पोलिसांकडून वसीम चिकनाची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून बिश्नोई गँगसंदर्भात बरीच माहिती समोर येऊ शकते.

Bishnoi Gang News: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, संभाजीनगरमधून बिश्नोई गँगच्या एकाला अटक
Mumbai Rain : मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसानं झोडपलं; विक्रोळीत इमारतीचा स्लॅब कोसळून बापलेकांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com