बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या कमालीचा चर्चेत आहे. त्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सलमान खानच्या सेक्यूरिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्याच्या घरासह त्याच्या खासगी सुरक्षेतही पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे. सलमान खानचा चाहतावर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच सलमानच्या पनवेल (Panvel) येथील फार्म हाऊसवर २४ वर्षीय चाहती आली होती. यावेळी तिने सलमानच्या फार्महाऊसबाहेर उभी सलमानसोबत लग्न करण्याचा हट्ट करत होती.
यानंतर त्या तरुणीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पनवेलमध्ये सलमान खानचे खूप मोठं फार्म हाऊस आहे. सलमान अनेकदा त्या फार्म हाऊसवर स्पॉट होतो. त्याच फार्महाऊसबाहेर सलमानच्या एका चाहतीने त्याच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट केला होता. ती मुळची दिल्लीमधील आहे. लग्नाचा हट्ट करणाऱ्या ह्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ती सलमानची खूप मोठी फॅन आहे. त्याचा चाहतावर्ग फक्त भारतातच नसून जगभरामध्ये आहे. चौकशीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ती स्वत:च्या मर्जीने तिकडे आली होती.
टाईम्स इंडियाच्या वृत्तानुसार, ती दिल्लीची तरुणी २४ वर्षांची आहे. अटक केल्यानंतर तिला पोलिसांनी एका NGO कडे काऊन्सिलिंगसाठी पाठवले आहे. त्या तरुणीने नवी दिल्ली ते नवी मुंबई असा प्रवास एकटीनेच केला होता. NGOच्या संस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, "२२ मे रोजी त्या मुलीला पोलिसांनी आमच्याकडे आणले. आम्हाला तिची प्रकृती खूपच गंभीर वाटली, कारण ती आमचं कोणतंही म्हणणं ऐकण्यासाठी नकार देत होती. तिला सलमान खानशी लग्न करायचे होते. ती सलमान खानच्या प्रेमात पडली होती."
त्या मुलीने NGO ला दिलेल्या माहितीनुसार, "मी बालपणापासून सलमानचे चित्रपट पाहते. मला सलमानसोबत लग्न करायचे आहे, असा निरागस विचार माझ्या मनात होता. आता पनवेलला येऊन हे सर्व झाल्यावर माझी चूक झाल्याचे माझ्या लक्षात आले. सलमान त्याचे आयुष्य जगत आहे आणि तो चित्रपटात आहे तसा नाहीये." त्या तरूणीचे मानसिक संतुलन व्यवस्थित नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्या तरुणीला कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती NGOच्या संस्थापकांनी सांगितले. संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या आईलाही देण्यात आली आहे. आठ दिवसांच्या काऊन्सिलिंगनंतर ती मुलगी दिल्लीला रवाना झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.