Mr And Mrs Mahi : जान्हवी कपूर जबरा फॅन! अभिनेत्रीसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक

Janhvi Kapoor Film : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरसाठी एका पठ्ठ्यानं थेट सोलापूरात संपूर्ण थिएटर बुक केलं आहे. अभिनेत्रीच्या ह्या जबऱ्या फॅनने लाखो रुपये खर्चुन थिएटर बुक केले आहे.
Mr And Mrs Mahi : जान्हवी कपूर जबरा फॅन! अभिनेत्रीसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक
Janhvi Kapoor Fan Booked Completely TheaterSaam Tv

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचा चित्रपट रिलीज होणार म्हटल्यावर चाहते आवर्जुन थिएटरमध्ये चित्रपट पाहायला जातात. आपण आजवर सलमान खान किंवा शाहरुख खानचे चित्रपट थिएटरला रिलीज झाले की थिएटर्स फुल्ल झालेले पाहिले आहेत. चित्रपट पाहायला गेल्यानंतर अनेक महारथी अतरंगी प्रकार करताना ही आपल्याला दिसतात. मात्र, यावेळी शाहरुख किंवा सलमानसाठी नाही तर बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीदेवीची लेक खास जान्हवी कपूरसाठी एका पठ्ठ्यानं थेट सोलापूरात संपूर्ण थिएटर बुक केलं आहे. सोलापुरातील जान्हवी कपूरच्या जबऱ्या फॅनने लाखो रुपये खर्चुन हे थिएटर बुक केले आहे.

Mr And Mrs Mahi : जान्हवी कपूर जबरा फॅन! अभिनेत्रीसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक
Rinku Rajguru Birthday : अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदललं रिंकू राजगुरूचं नशीब; बॉडीगार्डस घेऊन जायची शाळेत

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी आणि राजकुमारने पहिल्यांदाच एकत्रित स्क्रिन शेअर केली आहे. जान्हवी कपूरचा हा चित्रपट पाहण्यासाठी सोलापुरातील तिच्या चाहत्याने संपूर्ण थिएटर बुक केलं आहे. सलग तीन दिवस त्याने थिएटर बुक केल्याचं दिसून आलं. तब्बल ६ लाख रुपये खर्चून त्याने हे थिएटर बुक केले आहेत. सोलापुरातील जान्हवीचा हा जबरा फॅन सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

धर्मराज गुंडे असं सोलापुरातील जान्हवी कपूरच्या जबऱ्या फॅनचं नाव आहे. सोलापूर शहरातील जान्हवी कपूरच्या चाहत्या कडून सिनेमांचं सर्व सामान्य व्यक्तींसाठी मोफत स्क्रिनिंग करण्यात आलं. पठ्ठ्याच्या कामगिरीमुळे सोलापूरकरांचा या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये चित्रपटाचं जोरदार कौतुक होत आहे. महेंद्र आणि माहीची लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाने तीन १६.८५ कोटींची कमाई केलेली आहे.

Mr And Mrs Mahi : जान्हवी कपूर जबरा फॅन! अभिनेत्रीसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक
Anant- Radhika 2nd Pre Wedding : प्री-वेडिंग अनंत-राधिकाचा पण चर्चा जान्हवी- शिखरची; भर पार्टीत अभिनेत्रीने बॉयफ्रेंडला भरवला घास, Video Viral

'मिस्टर अँड मिसेस माही'चे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथेत क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या कपलची स्टोरी दाखवली आहे. हा चित्रपट एक अयशस्वी क्रिकेटर आपल्या पत्नीला तिची स्वप्ने पूर्ण करण्यास कशी मदत करतो यावर आधारित आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसह प्रमुख भूमिकेत कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी, जरीना वहाब आणि राजेश शर्मा सारखे अनेक कलाकार आहेत.

Mr And Mrs Mahi : जान्हवी कपूर जबरा फॅन! अभिनेत्रीसाठी सोलापूरच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक
Mr And Mrs Mahi ला प्रेक्षकांकडून खास प्रतिसाद नाही, तिसऱ्या दिवशी केली फार कमी कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com