Riteish Deshmukh On Nasrapur Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh: 'शिवाजी राजेंच्या काळातील चौरंग करण्याची शिक्षा दिली पाहिजे...'; नसरापूर घटनेवरून रितेश देशमुख संतापला

Riteish Deshmukh On Nasrapur Case: नसरापूर घटनेवर अभिनेता रितेश देशमुखने संताप व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुण्यातील दगडूशेठ गणपती दर्शनावेळी त्याने प्रतिक्रिया दिली.

Shruti Vilas Kadam

Riteish Deshmukh On Nasrapur Case: पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेविरोधात अभिनेता रितेश देशमुखने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी आला असताना त्याने माध्यमांशी संवाद साधत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

चौरंग करण्यासारखी कठोर शिक्षा दिली पाहिजे

यावेळी बोलताना रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षांचा संदर्भ देत म्हणाला, “त्या काळात अशा गुन्ह्यांसाठी चौरंग करण्यासारखी कठोर शिक्षा दिली जात होती. आजचा काळ वेगळा असला तरी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे,” त्यांनी पुढे सांगितले की, अशा घटनांमुळे समाजात भीती आणि अस्वस्थता निर्माण होते, त्यामुळे पोलिस, सरकार आणि न्यायव्यवस्थेने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

राजा शिवाजी

दरम्यान, रितेश देशमुख यांचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानिमित्ताने तो बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. चित्रपटाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “इतिहास कसा असतो आणि आपल्या वारशाचे महत्त्व काय आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना घेऊन हा चित्रपट जरूर पाहावा.”

कलाकारांचा संताप

नसरापूर प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून विविध स्तरांतून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणावर रितेश देशमुखसह प्रविण तरडे आणि अंकिता वालावलकर यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी देखील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT