Ranveer Singh Birthday News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Birthday : लेखक ते 'गल्ली बॉय'; सुपरस्टार रणवीर सिंगचा कसा आहे जीवनप्रवास?, जाणून घ्या...

Ranveer Singh Life Journey : बॉलिवूडमधील उत्साही आणि कायमच एनर्जेटिक असणाऱ्या रणवीर सिंहचा आज ३९ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सिनेकलाकारांसह नेटकऱ्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऋतुजा कदम, साम टीव्ही

बॉलिवूडमधील सर्वात उत्साही आणि कायमच एनर्जेटिक असणाऱ्या सेलिब्रिटीचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंहचा आज ३९ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सिनेकलाकारांसह नेटकऱ्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आज ह्या अतरंगी कलाकाराचा वाढदिवस आहे. त्याचे चित्रपट, अभिनय, त्याने साकारलेल्या विविध भूमिका यामुळे तो कायमच चर्चेत असतो. मात्र, याबरोबरचच त्याची फॅशन, कपडे, स्टाईल यामुळेही तो फॅन्सचे कायम लक्ष वेधून घेत असतो. रणवीरने आज एक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रणवीर सिंहचा जन्म मुंबईत झाला. आज बॉलिवूडमध्ये त्याने संघर्षाने आपलं नाव कमावले आहे.

अमेरिकेमधील इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतले होते. त्याठिकाणी त्याने अभिनयाचे क्लासेस आणि थिएटरचा अभ्यास सुरु केला. त्याने 2010 मध्ये आदित्य चोप्राच्या 'बँड बाजा बारात' या सिनेमातून पदार्पण केलं. त्यासाठी 'बेस्ट मेल डेब्यु' म्हणून रणवीरला फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. पहिल्याच चित्रपटाने रणवीरला एका रात्रीत प्रसिद्ध केले होते.

रणवीर सिंहचं खरं आडनाव भवनानी असं आहे. बॉलिवूडमध्ये काम करताना अनेकांनी आपली नावे किंवा आडनावे बदलली आहेत. त्याचप्रमाणे रणवीर सिंहनेसुद्धा त्याच्या आडनावात बदल केला आहे. रणवीरच्या 'लुटेरा' आणि 'लेडीज vs रिकी बहल' या सिनेमांनी खास छाप पाडली नाही. पण, राम लीला, दिल धडकने दो, बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिम्बा आणि गली बॉय यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली. चौकटीबाहेरील पात्र साकारत रणवीरने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. रणवीर सिंहचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार रणवीर सिंगची अंदाजे एकूण भारतीय रुपयांप्रमाणे अंदाजे ३३४ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्यासोबतच रणवीर सिंहला महागड्या कारची आव़ड आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण 14 नोव्हेंबर 2018 रोजी विवाहबद्ध झाले. दोघांनी इटलीतील लेक कोमो याठिकाणी लग्न केले. रणवीर आणि दीपिकाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाला आता 6 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि रणवीर सिंह आता बाबा होणार आहे.

रणवीर सिंहच्या सिनेमांची त्याच्या फॅन्सला कायमच उत्सुकता असते. नव्या वर्षात रणवीरचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिंघम अगेन, डॉन ३, शक्तिमान, सिम्बा २, बॅजू बावरा अशा धमाकेदार सिनेमांमधून तो झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Maharashtra Live News Update: दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय - प्रताप सरनाईक

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT