Randhir Kapoor Struggle Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Randhir Kapoor Birthday: मुलींच्या शाळेची फी भरायलाही रणधीर कपूर यांच्याकडे नव्हते पैसे, कर्जबाजारीपणाचा ही केला सामना

Randhir Kapoor Struggle Story: प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर यांचा आज अर्थात १५ फेब्रुवारीला ७७ वा वाढदिवस आहे.

Chetan Bodke

Randhir Kapoor Birthday

प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर यांचा आज अर्थात १५ फेब्रुवारीला ७७ वा वाढदिवस आहे. रणधीर कपूर हे ९० च्या काळातील हिंदी सिनेसृष्टीतील टॉपच्या स्टार्सपैकी एक अभिनेते होते. त्यांनी सिनेसृष्टीमध्ये जवळपास ६ दशके काम केले आहे. त्यांनी आजवर आपल्या सिनेकारकिर्दित एकूण २७ चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये 'चाचा भतीजा', 'हमराही', 'जवानी दीवानी' या चित्रपटांचा समावेश आहे. रणधीर हे कपूर घराण्यातील एक प्रसिद्ध अभिनेते असले तरीही त्यांना त्यांच्या इतर भावांप्रमाणे चित्रपटांत यश मिळाले नाही.

रणधीर कपूर यांची अभिनेत्री बबिता पत्नी होती. तर करिश्मा आणि करिना त्यांच्या मुली आहेत. चित्रपटामध्ये त्यांना फारशी चांगली प्रसिद्धी न मिळाल्याने त्यांना अनेकदा पैशांची चणचण भासायची. एकदा मुलगी करीना करिश्मा यांच्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. याचा उल्लेख खुद्द अभिनेत्याने केला होता. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठीही आपल्याकडे पैसे नसल्याचं अभिनेत्याने सांगितलं होतं. रणधीर कपूर यांच्याकडे एकदा करिश्मा आणि करीनाची ट्यूशन फी भरण्यासाठीही पैसे नव्हते.

रणधीर कपूर यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, त्यावेळी त्यांना अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले होते. रणधीर हे कपूर घराण्यातील एक प्रसिद्ध अभिनेते असले तरीही त्यांना त्यांच्या इतर भावांप्रमाणे चित्रपटांत यश मिळाले नाही. आपल्या वडीलांकडे पैशांची चणचण असल्याने अभिनेत्री करिश्मा कपूरने वडीलांच्या खांद्याला खांदा लावत त्यांना घर खर्चाला मदत केली होती. करिश्मा आणि करीना या दोघींचीही गणना आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : धुक्याची चादर अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, पावसाच्या सरींमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ठिकाण

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SCROLL FOR NEXT