Prathamesh Parab
Prathamesh Parab Instagram

Prathamesh Parab : अखेर दगडूला भेटली खरी प्राजू, 'व्हॅलेंटाईन डे'लाच प्रथमेश परबने उरकला साखरपुडा

Prathamesh Parab Engagement : मराठी सिनेसृष्टीतील दगडू उर्फ प्रथमेश परबला खऱ्या आयुष्यातील प्राजू मिळाली आहे. अभिनेता प्रथमेशने व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत क्षितिजा घोसाळकरसोबत साखरपुडा उरकला आहे.
Published on

Prathamesh Parab Engagement :

मराठी सिनेसृष्टीतील दगडू उर्फ प्रथमेश परबला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटली. अभिनेता प्रथमेशने व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत क्षितिजा घोसाळकरसोबत साखरपुडा उरकला आहे. अभिनेता प्रथमेशने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

अभिनेता प्रथमेश परबने व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत क्षितिजा घोसाळकरसोबत साखरपुडा केल्यानंतर इन्स्टाग्रामर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली. 'आमचा व्हॅलेंटाईन डे' असं प्रथमेशने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. प्रथमेशने त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Prathamesh Parab
Gautami Patil: गौतमी पाटील कधी लग्न करणार?, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिलं उत्तर...

तत्पूर्वी, प्रथमेशचा 'ढिशक्यांव' हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे पोस्टरही समोर आलं आहे. सिनेमाच्या हटके पोस्टरमुळे प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली आहे. प्रथमेशच्या 'ढिशक्यांव' सिनेमात प्रेम आणि विनोद दोन्ही समीकरण पाहायला मिळतील.

Prathamesh Parab
M Manikandan: 'सर तुमची मेहनत तुमचीच आहे', प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी चोरी, चोरट्यांनी नॅशनल अवॉर्ड परत करत मागितली माफी

'ढिशक्यांव' सिनेमात संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे , अहेमद देशमुख या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.प्रथमेशने १४ फेब्रुवारीला म्हणजे 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी साखरपुडा केला. त्यातच प्रथमेश आणि क्षितिजाच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे. प्रथमेश आणि क्षितिज दोघे 24 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत.

Prathamesh Parab
Kushal Badrike: तुमच्यासोबत झालंय का कधी असं?, कुशल बद्रिकेची व्हॅलेंटाईन डे स्पेशल पोस्ट चर्चेत

प्रथमेशच्या फोटोवर शुभेच्छा आणि प्रतिक्रियांचा वर्षाव

प्रथमेशच्या साखरपुड्याच्या फोटोवर एका चाहत्याने म्हटलं की, 'अखेर दगडूला त्याची प्राजू भेटली. तीही कायमची भेटली'. तर एकाने म्हटलं की, आई बाबा आणि साई बाबाची शपथ... तुमची जोडी एक नंबर आहे'. 'दगडू दादूसची विकेट परली रे परली...अभिनंदन', अशीही भन्नाट कमेंट करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com