R Madhavan With Son Son Vedaant Saam TV
मनोरंजन बातम्या

Khelo India Youth Games: आर माधवनच्या मुलाची सोनेरी कामगिरी; वेदांतच्या कौतुकाचा सोशल मीडियावर डंका

वेदांतने खेलो इंडिया युथ गेम्समध्ये दणदणीत यश मिळवले आहे.

Pooja Dange

R Madhavan Son Vedaant Wins 7 medals: बॉलिवूडमध्ये आपण अनेक स्टारकिड पहिले आहेत. बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी त्यांच्या आई-वडिलांच्या पायावर पाय ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण काहीही असेही कलाकार आहेत ज्यांच्या मुलांना वेगळे विश्व खुणावत आहे. तसेच त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. असच काहीतरी वेगळं करत आर माधवनचा मुलगा वेदांत.

बॉलिवूड अभिनेता आर माधवनच्या मुलाने म्हणजे वेदांतने खेलो इंडिया युथ गेम्समध्ये दणदणीत यश मिळवले आहे. वेदांतने जलतरण स्पर्धेत पदक मिळवले आहेत. वेदांतने अनेक जलतरण स्पर्धांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे.

वेदांतने युथ गेम्समध्ये 5 सुवर्ण पदकं आणि 2 रौप्य पदकं जिंकली आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता आर माधवनला आपल्या मुलाने खेलो इंडिया युथ गेम्समध्ये केलेल्या कामगिरीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

माधवनने मुलाचे ट्रॉफी घेतानाचे आणि गेम्समध्ये पदके मिळवतानाचे फोटो शेअर केले. फर्नांडिस अपेक्षा (6 सुवर्ण, 1 रौप्य, PB $ रेकॉर्ड) आणि वेदांत माधवन (5 सुवर्ण आणि 2 रौप्य) यांच्या कामगिरीबद्दल खूप आभारी आणि नम्र. अथक प्रयत्नांसाठी @ansadxb आणि प्रदीप सर आणि @ChouhanShivraj आणि @ianuragthakur यांचे आभार. KheloIndiaInMP. खूप अभिमान आहे,” असे माधवनने ट्विटरवर लिहिले आहे.

माधवनने आणखी एक ट्विट करत आपल्या मुलाच्या या स्पर्धेतील कामगिरीबद्दल अधिक माहिती दिली. "देवाच्या कृपेने - 100 मीटर, 200 मीटर आणि 1500 मीटरमध्ये गोल्ड आणि 400 मीटर आणि 800 मीटरमध्ये सिल्वर पदकं मिळाले," असे माधवनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

वेदांत हा जलतरण क्षेत्रात भारतासाठी उदयोन्मुख प्रतिभावंतांपैकी एक आहे. यापूर्वी त्याने डॅनिश ओपनमध्ये पुरुषांच्या 800 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने अलेक्झांडर एल ब्योर्नच्या होमबॉयला मागे टाकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT