DDLJ Box Office Collection: पुन्हा हिट झाली राज-सिमरनची लव्ह स्टोरी, तब्बल 28 वर्षांनंतर 'डीडीएलजे'ची धमाकेदार कमाई

डीडीएलजे 16 फेब्रुवारीपर्यंत थिएटरमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
DDLJ Box Office Collection
DDLJ Box Office Collection Saam TV
Published On

DDLJ Box Office Collection After Its Re-Release: आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. राज आणि सिमरनच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. आजही हा चित्रपट मुंबईतील मराठा मंदिरात सुरू असून प्रेक्षक आवडीने तो बघण्यासाठी जातात. या चित्रपटामुळे शाहरुख खान रोमान्सचा किंग बनला. तर या चित्रपटानंतर शाहरुख आणि काजोलची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आणि आजही ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शित होऊन जवळपास 28 वर्षे उलटून गेली आहेत. तरीही राज आणि सिमरनला चाहत्यांनी पहिली पसंती दर्शवली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने खास या आठवड्यात काही रोमँटिक चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये डीडीएलजेचाही समावेश आहे.

PVR, Inox आणि Sinopolis सारख्या राष्ट्रीय मल्टिप्लेक्समध्ये 10 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. डीडीएलजे 16 फेब्रुवारीपर्यंत थिएटरमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. डीडीएलजे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांच्या २८ वर्षां पूर्वीच्या आठवणी परत जाग्या झाल्या आहेत. अवघ्या 2 दिवसांत या चित्रपटांने लाखोंची कमाई केली आहे.

DDLJ Box Office Collection
Kartik Aaryan Movie: कार्तिक आर्यनने सांगितले चित्रपट होण्यामागील रहस्य, म्हणतो 'मी प्रेक्षक म्हणून विचार करतो आणि...'

शाहरुख खानचा डीडीएलजे चित्रपट मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, लखनौ, नोएडा, डेहराडून, फरीदाबाद, दिल्ली, चंदीगड, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई यासह भारतातील ३७ हून अधिक शहरांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणे शाहरुख आणि काजोलच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही.

या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी 2.50 लाखांची कमाई झाली. 11 फेब्रुवारी 2023 रोजी त्यात मोठा नफा दिसला. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये 10 लाखांचा व्यवसाय केला. रिपोर्ट्सनुसार, तिसऱ्या दिवशीही चित्रपटाचा 10 लाखांचा व्यवसाय आहे. म्हणजेच तीन दिवसांत त्याची एकूण कमाई 22.5 लाख रुपये आहे.

14 फेब्रुवारी 2023 रोजी हा चित्रपट 20 लाख रुपयांपर्यंतचा व्यवसाय करू शकतो, असा विश्वास आहे. एकूणच या व्हॅलेंटाईन वीकमध्ये हा चित्रपट ६० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतो.

डीडीएलजे हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला होता. मुंबईतील 'मराठा मंदिर'मध्ये हा चित्रपट लवकरच 10 हजार दिवस पूर्ण करणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 9978 दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त डीडीएलजेही मर्यादित चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या दिवशी चित्रपटाने २७ लाखांची कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com