Saam TV
मनोरंजन बातम्या

Baloch Marathi Movie: अमोल कागणे पहिल्यांदाच दिसणार ऐतिहासिक भूमिकेत; बलोचमध्ये साकारणार सरफराज सुभेदार

Amol Kagne In Baloch: 'बलोच' या भव्य ऐतिहासिक चित्रपटातून अमोल पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.

Pooja Dange

Amol Kagane Playing Historical Character in Baloch: 'हलाल', 'भोंगा', 'बेफाम', 'वाजवूया बँड बाजा', 'लेथ जोशी' या चित्रपटांच्या निर्मितीनंतर अमोल कागणेने 'बाबो' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर अमोलने 'झोलझाल' चित्रपटामध्ये देखील अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आता अमोल एका नव्या चित्रपटातून आणि नव्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता, निर्माता अमोल कागणे फार कमी वयात सिनेमाविश्वात पाय रोवण्यात यशस्वी झाला आहे. विनोदी भूमिकेनंतर अमोल एक ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. 'बलोच' या भव्य ऐतिहासिक चित्रपटातून अमोल पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.

मराठ्यांची आणखी एक शौर्यगाथा मांडणारा हा 'बलोच' चित्रपट आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे, दरम्यान तेथील भयाण वास्तवाला ते कसे सामोरे गेले याचे चित्रण 'बलोच'मध्ये असणार आहे. (Latest Entertainment News)

मोहम्मद शाह अब्दाली यांच्या सैन्यदलातील एक सुभेदार ज्याचा या चित्रपटात प्रमुख वाटा आहे. सरफराज असे त्या सुभेदाराचे नाव आहे. या पात्राची भूमिका चित्रपटात अमोल कागणे साकारणार आहे. प्रवीण तरडे यांच्या सोबत अमोलचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे.

'बलोच' हा भव्यदिव्य सिनेमा अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत असून या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत.

तर महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे, जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड निर्माते असून पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार हे सहनिर्माते आहेत.

येत्या ५ मे रोजी 'बलोच' प्रदर्शित होणार आहे. ‘बलोच’च्या वितरणाची धुरा 'फिल्मास्त्र स्टुडिओज'च्या अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे.

वीर मराठ्यांच्या अनेक लढाया आजवर आपण मोठ्या पडद्यावर पाहिल्या आहेत. पानिपतची लढाई आपल्याला माहित आहे. त्याच्या परभावाविषयी आपण नेहमीच बोलत असतो. मात्र 'बलोच'विषयी जाणून घेणं तितकं महत्त्वाचं आहे.

पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात ज्या गुलामगिरीला समोर जावं लागलं, मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'बलोच' चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

येत्या ५ मे रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करून देणार आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता सिनेमा म्हणजे 'बलोच'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT