Famous Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Famous Action Star Passes Away : मनोरंजन सृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 54 वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्याच्या करिअर संबंधित जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले.

वयाच्या 54 वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला.

मनोरंजन विश्वातील आणखी एक तेजस्वी तारा हरपला. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याचे निधन झाले. 'बफी द व्हॅम्पायर स्लेअर' या गाजलेल्या व्हॅम्पायर टीव्ही मालिकेत झँडर हॅरिसची भूमिका साकारणारे निकोलस ब्रेंडन (Nicholas Brendon) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

कुटुंबियांनी पोस्टमध्ये म्हटले की, "आमचा भाऊ आणि मुलगा निकोलस ब्रेंडन याच्या निधनाची बातमी देताना आम्हाला खूप दुःख होत आहे..." निकोलस ब्रेंड यांच्या निधनाचे कारण कुटुंबियांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, "नैसर्गिक कारणांमुळे निकोलस ब्रेंडन झोपेतच निधन पावले" पोस्टमध्ये पुढे म्हटले की," "बहुतेक लोक निकीला एक अभिनेता म्हणून त्याच्या कामासाठी आणि त्याने वर्षानुवर्षे साकारलेल्या पात्रांसाठी ओळखतात. अलिकडच्या वर्षांत निकीला चित्रकला आणि कलेमध्ये त्याची आवड सापडली होती. "

पोस्टमध्ये शेवटी म्हटले की, "कला हे निकोलसच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात शुद्ध प्रतिबिंब होते. या दुःखाच्या काळात आमच्या privacy चा आदर करा.ज्यांनी प्रेम आणि पाठिंबा दाखवला आहे त्या सर्वांचे आभार..." निकोलस ब्रेंडन यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ब्रेंडन यांना 2022 ला हृदयविकाराचा झटका आला होता. तसेच ते कॉडा इक्विना सिंड्रोम देखील ग्रस्त होते. याचा खुलासा आधीच निकोलस ब्रेंडन यांनी केला होता.

निकोलस ब्रेंडनची कारकीर्द

'बफी द व्हॅम्पायर स्लेअर'मधील कामासाठी निकोलस ब्रेंडन सर्वाधिक ओळखला गेला. ब्रेंडनने 2021 पर्यंत चित्रपट आणि दूरचित्रवाणीमध्ये अभिनय करणे सुरू ठेवले, ज्यात ब्रॅडली कूपरसोबत 'क्रिमिनल माइंड्स' आणि 'किचन कॉन्फिडेन्शियल' सारख्या प्रोजेक्टचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT