KRK news  saam tv
मनोरंजन बातम्या

KRK : १० दिवसांचा तुरूंगवास फक्त पाण्यावर..., केआरकेच्या ट्विटमुळे पुन्हा नवा वाद

अभिनेता केआरकेने पुन्हा ट्विट करत नव्या चर्चेला आमंत्रित केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सडेतोड स्वभाव, परखड व्यक्तिमत्व अशी सांगड असलेला अभिनेता कमाल आर खान(kamaal r khan) सोशल मीडियावर त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी केआरकेला जुन्या ट्विट(Twitter) प्रकरणी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला. पुन्हा एकदा अभिनेता त्याच्या हटके शैलीत परतला आहे. नुकताच तुरूंगातून परतल्यानंतर अभिनेता केआरकेने पुन्हा ट्विट करत नव्या चर्चेला आमंत्रित केले आहे.

३० ऑगस्ट रोजी केआरकेला मुंबई पोलिसांनी २०२० मध्ये केलेल्या एका ट्विटवरील वादग्रस्त विधानावरून अटक केली होती. परंतु जामीन मिळाल्यानंतर केआरकेने सोशल मीडियावर धमाकेदार पुनरागमन केलं आहे. नुकतेच केआरकेने एक ट्विट करत त्याचा तुरुंगातील अनुभव सांगितला आहे.

केआरकेने नुकताच ट्विट करत, 'मी तुरूगांत १० दिवस केवळ फक्त पाण्यावर काढले आहेत. अशा परिस्थितीत माझे वजन १० किलोने कमी झाले आहे'. असे सांगितले आहे. अभिनेता केआरकेचे हे वक्तव्य चाहत्यांना योग्य वाटत नसून अनेकजण कमेंट करून प्रतिक्रियाही देत ​​आहेत. तर काही नेटकरी केआरकेला ट्रोल देखील करत आहेत. 'अह्ह् तेरी.. सर, तुम्ही तर २० किलोचे वाटत आहात' असे एका यूजर्सने म्हटले आहे. तर आणखी एकाने, '१० दिवसांत १० किलो वजन कसे कमी होऊ शकते?' असा थेट प्रश्न केला आहे.

केआरके एक चित्रपट समीक्षक आहे. केआरके कडून नुकताच प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या रिव्ह्यूचीही चाहते मागणी करत आहे. तर एका नेटकऱ्याने सर तुम्ही चित्रपटाचे परिक्षण करणे का थांबवले? असा प्रश्न केला आहे. त्याचवेळी दुसऱ्याने, 'कृपया तुरुंगातील तुमचे दिवस आणि 'ब्रह्मास्त्र' परिक्षण करा अशी विनंती त्याला केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT