सध्या संपूर्ण राज्यासह मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकाता येथे झालेल्या डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरातील घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरातील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवरील लैगिंक शोषणाच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होतोय. या घटनेच्या निषेधार्थ अनेक नेते, कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. याच घटनेवर सोशल मीडियावर परखडपणे भूमिका मांडणारे किरण मानेंनी बदलापूर घटनाच्या निषेधार्थ पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर बदलापूर येथे आंदोलक जमावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. " जनतेचा काळीज पिळवटणारा आक्रोश ऐका, असं त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 'क्रूर आणि कोडग्या सत्ताधार्यांनो...जेव्हा एका लहान लेकरावर अत्याचार होतो ना, तेव्हा ती जखम आणि ती वेदना प्रत्येक स्त्रीला होते. महाराष्ट्रातल्या घराघरातली एकेक 'लाडकी बहीण' आज बदलापूरमधील लेकी वेदनेनं कळवळतेय... या माताभगिनीच्या काळजात खदखदणार्या या वेदनेची आग तुमच्या भ्रष्ट सरकारची राखरांगोळी करून टाकणार..." अस म्हटलं आहे.
पुढे त्यांनी, "'ती' स्त्रित्वाच्या सुरक्षिततेपेक्षा तुम्ही फेकलेल्या दीड हजार रुपड्यांना भुलेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखलेलं नाही.मेंदूत कोरुन ठेवा, जनतेचा हा उद्रेक तुम्हाला नेस्तनाबूत करणार." असं म्हणत बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर किरन मानेंची पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे.अभिनेता किरण माने नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आता देखील किरण मानेनीं बदलापूरच्या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.