Bigg Boss Marathi: अरबाजला गमवावा लागणार कॅप्टनपद? बिग बॉसच्या एका निर्णयाने सर्वांनाच बसणार धक्का

Bigg Boss Marathi New Promo: बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज पटेल समोर संकट उभं राहल्याचं दिसून येत आहे.
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi Saam Tv
Published On

मनोरंजनविश्वात बिग बॉस मराठी सीझन ५ ची तुफान चर्चा आहे. हा शो सुरू झाल्यापासून पहिल्याच दिवसांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे. बिग बॉसच्या घरात अनेक वाद, राडे, प्रेम , भांडण पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठी सीझन ५ चा चौथा आठवडा सुरू आहे. या चौथ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात A आणि B दोन गट तयार झाले आहेत. एका गटात निक्की, वैभव, सूरज, इरिना, जान्हवी आणि घनश्याम आहेत. तर दुसऱ्या टीममध्ये अंकिची, अभिजीत, धनंजय, वर्षा ताई, पॅडी दादा आणि आर्या आहेत. दोन्ही गटांची उत्तम खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे.

Bigg Boss Marathi
Stree 2' Box Office Collection Day 5: श्रद्धाच्या ' स्त्री २ ' सिनेमाची छप्पर फाड कमाई, ५ व्या दिवशी पार केला २५० टप्पा

बॉसच्या घरात कॅप्टन पद महत्वाचे मानले जाते. ज्या ग्रुपचा कॅप्टन असेल त्या स्पर्धकाला काही खास अधिकार असतात. तसेच बिग बॉसच्या घरातील निर्णय तो घेऊ शकतो. ज्यामुळे ज्या टीममधील स्पर्धक कॅप्टन होईल त्या टीमला याचा अधिका फायदा होतो.

Bigg Boss Marathi
Samantha Prabhu: आधी कोलकाता, आता बदलापूर; सुरक्षितता, महिला अत्याचाराच्या घटनांवर अभिनेत्री थेट बोलली

बिग बॉस मराठी सीझन ५ च्या पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर ही कॅप्टन झाली. यानंतर आता दुसरा कॅप्टन कोण होणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. बिग बॉस मराठीच्या घरात दुसऱ्या आठवड्यात अरबाज पटेल हा कॅप्टन ठरला.

मात्र आता, अरबाजचं कॅप्टनपद धोक्यात आल्याचं दिसून येत आहे. नुकताच कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज पटेल समोर संकट उभं राहल्याचं दिसून येत आहे.

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस अरबाजला म्हणतायेत की, "अरबाज बीबी करन्सीद्वारे दोन्ही टीम्स सोयी सुविधा विकत घेऊ शकतात. त्या बदल्यात तुम्हाला कॅप्टन पद गमवावे लागेल. आता आपल्याला आपला फायदा निवडायचा आहे किंवा घराचा फायदा."

यावरून, अरबाज आता स्वत:चा की घराचा फायदा निवडणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. अरबाज कॅप्टन पद गमावणार या विचाराने निक्की टेन्शनमध्ये आली आहे. अरबाजच्या स्वार्थासाठी इतर सदस्यांना याचा फटका बसणार का? हे आजच्या भागात पाहायला मिळेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com