Dheeraj Kumar 
मनोरंजन बातम्या

Actor Passes Away: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते निर्माते काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Bollywood Actor Passes Away: बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता धीरज कुमार यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले आहे.

Shruti Vilas Kadam

Bollywood Actor Passes Away: बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता धीरज कुमार यांचे वयाच्या ८०व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

धीरज कुमार यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९६५ मध्ये केली होती. त्यांनी ‘स्वामी’, ‘रातों का राजा’, ‘हेरा फेरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. अभिनयाबरोबरच त्यांनी दूरदर्शन म्हणजेच छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमठवला.

१९८६ मध्ये त्यांनी ‘क्रिएटिव्ह आय लिमिटेड’ नावाची प्रोडक्शन कंपनी सुरू केली. या बॅनरअंतर्गत त्यांनी ‘ओम नमः शिवाय’, ‘श्री गणेश’, ‘जय संतोषी माँ’, ‘शोभा सोमनाथ की’ यांसारख्या लोकप्रिय धार्मिक मालिकांची निर्मीती आणि दिग्दर्शन केले होते.

धीरज कुमार हे एक कुशल निर्माते, संवेदनशील दिग्दर्शक आणि समर्पित कलाकार होते. त्यांच्या निधनामुळे टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT