Sangeet Manapmaan Released Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangeet Manapmaan Released Date: ‘संगीत मानापमान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, सुबोध भावेकडून प्रदर्शनाची तारीख जाहीर

Sangeet Manapmaan Film: ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेने ‘संगीत मानापमान’ या चित्रपटातून एक भव्यदिव्य संगीतमय नजराणा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन घेत आहे. नुकतंच अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Chetan Bodke

Sangeet Manapmaan Released Date

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर राज्य केले. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वत्र प्रचंड कौतुक झाले. त्या चित्रपटातील गाणी आजही तरुणांच्या स्मार्टफोनवर ऐकायला पाहायला मिळतात. ‘कट्यार काळजात घुसली’च्या माध्यमातून तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची आणि नाट्यसंगीताची आवड निर्माण झाली.

गेल्या काही दिवसांपूर्वीच सुबोध भावेने नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे आणखी एक भव्यदिव्य संगीतमय नजराणा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन घेत आहे. ‘संगीत मानापमान’ असं या चित्रपटाचं नाव असून अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. (Marathi Film)

सर्वात आधी ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मी वसंतराव’नंतर आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोधच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘संगीत मानापमान’ असं आहे. नुकतंच सुबोधने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. हा चित्रपट येत्या दिवाळी २०२४ मध्ये हा चित्रपट रिलीज होतोय. (Marathi Actors)

सुबोध भावे आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “आज मराठी संगीत रंगभूमीवरील एक सोन्याचे पान असलेल्या 'संगीत मानापमान' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ११३ वर्षे पूर्ण झाली. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाचे आजतागायत रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात अनेकांचा वाटा आहे. आजच्या दिवशी या अजरामर कलाकृतीला आणि सर्व दिग्गजांना वंदन करून, सादर करीत आहोत, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवर प्रेरित एक संगीतमय चित्रपट 'संगीत मानापमान!' १ नोव्हेंबर २०२४, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित...” अशी पोस्ट लिहित अभिनेत्याने चाहत्यांना चित्रपटाबद्दलची अपडेट दिली आहे. (Social Media)

या चित्रपटाच्या शुटिंगला सप्टेंबर २०२३ पासून सुरूवात झाली होती. अखेर जानेवारी २०२४मध्ये ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं होतं. तेव्हापासून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. अद्याप चित्रपटातली स्टारकास्ट जाहीर झालेली नसून चित्रपटामध्ये कोणकोण दिसणार याबद्दल सर्वच उत्सुक आहेत. अभिनेत्याची पोस्ट पाहून फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही त्याला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Maharashtra Live News Update: पत्नीच्या हत्ये प्रकरणातील कैद्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

SCROLL FOR NEXT