dharmendra death Saam tv
मनोरंजन बातम्या

खरे 'ही मॅन', ते कायम आठवणीत राहतील; धर्मेंद्र यांच्या निधनानंर सचिन पिळगावकरांची भावनिक पोस्ट

dharmendra : मी भाग्यवान...कारण मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, अशी भावनिक पोस्ट सचिन पिळगावकर यांनी केली आहे.

Saam Tv

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन

श्वसनाचा त्रास वाढल्याने रुग्णालयात उपचार सुरु होते

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली

सचिन पिळगावकरांनी भावनिक पोस्ट करत धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. ६ दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा तारा निखळल्याने बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही भावनिक पोस्ट करत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना काही दिवसांपासून श्वसनाशी संबंधित त्रास जाणवत होता. रुग्णालयात डॉक्टरांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यांना डिस्चार्जही मिळाला होता. आज त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर धर्मेंद्र यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सचिन पिळगावकर यांनी श्रद्धांजली वाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

सचिन पिळगावकर म्हणाले, 'धर्मेंद्र आपल्याला सोडून गेलेत. त्यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द नेहमी एका उंचीवरच राहील. मी भाग्यवान आहे की, मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. खरे 'ही मॅन' यांच्या आठवणी आपल्या हृदयात सदैव जिवंत राहतील. ॐ शांती."

तडफदार नायक हरपला; शरद पवारांनी वाहिली धर्मेंद्र यांना श्रद्धांजली

शरद पवार म्हणाले, '१९६० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती. 'शोले'मध्ये त्यांनी साकारलेला 'वीरू' आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; कोणत्या भागातला पाणीपुरवठा राहणार बंद?

Maharashtra Live News Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगावमध्ये होणार मुख्यमंत्र्यांची सभा

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; विरोधीपक्षानंतर भाजपने घेतली हरकत, नेमकं काय घडलं?

Dr Gauri Gajge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Mangalsutra Importance: काळा रंग अशुभ मानतात, तरीही मंगळसूत्राचे मणी काळे का असतात?

SCROLL FOR NEXT