पंजाबी (Punjab) अभिनेता दीप सिद्धू मंगळवारी दिल्लीहून (Delhi) पंजाबला परतत होता. यादरम्यान सोनीपतमधील खरखोडाजवळ झालेल्या अपघातात (Accident) त्याचा मृत्यू झालाया आहे. प्रत्यक्षात त्यांची कार एका ट्रकला धडकली. कुंडली-मानेसर-पालवाल द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होता की दीप सिद्धूच्या कारचा चक्काचूर झाला आहे.
अपघाताच्या वेळी त्यांची एनआरआय मैत्रिण रीना राय देखील स्कॉर्पिओमध्ये स्वार होती. मात्र सुदैवाने ती वाचली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे .
हे देखील पहा -
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस घटनासथळी पोहोचेपर्यंत दीप सिद्धूचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी त्याची एनआरआय मैत्रिण रीना राय हिला उपचारासाठी खारखोडा येथील रुग्णालयात आणण्यात आले होते.
राजकारणातही सुप्रसिद्ध ओळख
सिद्धू हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असून राजकारणातही ते नावाजलेले होते. दीप याच्या निधनामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
सनी देओलच्या प्रचार टीममध्ये सामील झाला
2019 मध्ये, अभिनेता सनी देओलने गुरुदासपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्याने दीप सिद्धूलाही आपल्या निवडणूक प्रचाराच्या टीममध्ये ठेवले होते.
लाल किल्ला हिंसाचारातील मुख्य आरोपी
लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात अटक होण्याआधीही दीप सिद्धू यास अन्य दोन प्रकरणांत अटक झाली होती. शेतकरी आंदोलनादरम्यान सिद्धू याचं नाव गाजलं होतं. लाल किल्ला प्रकरणात त्याच्यावर धार्मिक ध्वज फडकावल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्याला पोलिसांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीत अटक देखील केली होती. तो लाल किल्ला हिंसाचारात मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी दिल्ली न्यायालयात सांगितले होते. मात्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.
Edited By - Shivani Tickule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.