हिजाब प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न - डॉ.मुणगेकर

भाजप हिजाब प्रकरणावरून राजकारण करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे.
Dr.Bhalchandra Mungekar
Dr.Bhalchandra MungekarSaamTvNews
Published On

- राजेश भोस्तेकर

रायगड : भाजप हिजाब घालण्यावरून जे राजकारण करीत आहे हे हिणकस आहे. विद्यार्थ्यांमध्ये हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करण्याचे नियोजनबद्ध काम भाजप (BJP) करीत असल्याचा आरोप मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार आणि अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर (Dr.Bhalchandra Mungekar) यांनी केला आहे.

हे देखील पहा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या प्रकरणात जराही हस्तक्षेप केलेला नाही. याला माझा आक्षेप असल्याचे ते म्हणाले. हिजाब (प्रकरणावरून कर्नाटक (Karnataka) सरकारने राजकारण करून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद केल्या ही नामुष्कीची गोष्ट असल्याचे मुणगेकर यांनी म्हटले आहे. अलिबाग (Alibag) मधील सहयोग पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर याचे विद्यमान भारतीय अर्थव्यवस्था याविषयावर मेघा चित्रमंदिर येथे व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यानानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Dr.Bhalchandra Mungekar
'सॅड साॅंग' ऐकून नांदेडमधील तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले..!

यावेळी हिजाब (Hijab) प्रकरणावरून बोलताना त्यांनी भाजपवर निशाण साधला. हिजाब घालणार नाही, वापरणार नाही असे विद्यार्थी बोलत असतील तर मी त्याचे स्वागत करतो. मात्र, यावरून भाजपने राजकारण सुरू केले आहे. धार्मिक आणि जातीय राजकारण करून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप मुणगेकर यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com