Riteish Deshmukh Shared Emotional Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh Post : "हॅप्पी बर्थ-डे पप्पा"; अभिनेता रितेश देशमुख वडिलांच्या आठवणीत भावूक

Riteish Deshmukh Shared Emotional Post : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुखने खास वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता आणि त्यांचा मुलगा रितेश देशमुख याने खास वडिलांसाठी पोस्ट शेअर केली आहे.

आज विलासराव देशमुख यांची ७९ वी जयंती आहे. यांच्या जयंतीनिमित्त लातूरच्या तासगावात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख आणि त्यांचे दोन्हीही मुलं विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना रितेशने "हॅप्पी बर्थ-डे पप्पा" असं कॅप्शन देत फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करताना त्यांनी 'पापा मेरी जान' हे गाणं बॅकग्राऊंडला लावलेलं आहे.

रितेश देशमुख अनेकदा इन्स्टाग्रामवर सक्रिय असतो. तो आपल्या कुटुंबीयांसोबत वेगवेगळ्या रिल्स करत असतो. रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे तर, 'बिग बॉस मराठी ५'चा होस्ट म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप शोची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच शोचा प्रोमो रिलीज झालेला होता. अभिनेता 'हाऊसफुल्ल ५' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं अभिनेता दिग्दर्शन करीत आहे. हे दोन्हीही चित्रपट येत्या २०२५ या वर्षात रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT