Pushpa Fitness Routine google
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 stampede Case : अल्लू अर्जूनला मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन, काय आहे नेमकं प्रकरण?

Actor Allu Arjun News : चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जूनला मोठा दिलासा मिळाला आहे. हैदराबादच्या कोर्टाने अल्लू अर्जूनला जामीन मिळाला आहे. अल्लूला नियमीत जामीन मंजूर झाला आहे.

Vishal Gangurde

Pushpa 2 stampede case : अभिनेता अल्लू अर्जूनला मोठा दिलासा मिळाला आहे. संध्या थिएटर येथे चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जूनला कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. हैदराबादच्या नामपल्ली कोर्टात शुक्रवारी अभिनेता अल्लू अर्जूनला नियमीत जामीन मंजूर झाला आहे. ४ डिसेंबर रोजी अल्लू अर्जूनच्या पुष्पा २ सिनेमासाी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर १ लहान बाळ जखमी झालं होतं.

अभिनेता अल्लू अर्जूनला 'पुष्पा २' या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्लू अर्जूनला कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला आहे. अल्लूला ५०००० रुपयांच्या जात मुचलक्यावर अटींसहित जामीन मंजूर केला आहे.

काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जूनला त्याची टीम आणि थिएटर व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जून कोर्टासमोर व्हर्च्युअल सादर झाला होता. २७ डिसेंबर रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचा अवधी संपल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जूनला कोर्टासमोर हजर राहावं लागलं. ३१ डिसेंबर रोजी नामपल्ली जिल्हा न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, ३ जानेवारीपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आज अल्लू अर्जुनला नियमीत जामीन मंजूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT