Anurag Thakur On OTT saam tv
मनोरंजन बातम्या

Anurag Thakur: ओटीटी माध्यमांवरील अश्लिल कंटेंटबद्दल कारवाई? केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकुरांचा मोठा निर्णय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सांगितल्या प्रमाणे, क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली ओटीटीवरील असभ्यता आणि अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही.

Chetan Bodke

Anurag Thakur On OTT: सध्या ओटीटीने अवघ्या जगभरात प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. कोरोनाच्या काळात ओटीटीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. पण याच ओटीटीवर आता केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने काही निर्बंध लावलेत. ओटीटीवरील चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक वेळा शिव्या असणारे डायलॉग्स, काही बोल्ड सीन असलेले चित्रीकरण दाखवले जातात.

त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे. नुकतंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सांगितल्या प्रमाणे, क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली ओटीटीवरील असभ्यता आणि अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही.

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम आणि झी ५ व्हिडीओ यासारख्या ओटीटीवर काही निर्बंध लावले आहेत.सर्जनशीलतेच्या नावाखाली अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत, असे ठाकूर पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात, “ओटीटी प्लॅटफॉर्मवर अपमानास्पद आणि अश्लील मजकूर वाढत असल्याच्या तक्रारींबाबत सरकार गंभीर आहे.” असे त्यांनी सांगितले.

“यासंदर्भात नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज असल्याचा विचार सध्या मंत्रालय करीत आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लीलतेसाठी नाही तर क्रिएटीव्हीटीसाठी स्वातंत्र्य दिले गेले होते. पण सध्या सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म याच्या मर्यादा ओलांडत आहेत. तेव्हा क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली ओटीटीवरील असभ्यता आणि अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही. यावर कितीही आवश्यक कारवाई करावी लागली तरी सरकार कारवाई केल्याशिवाय मागे हटणार नाही.”

अनुराग ठाकूर म्हणतात, “ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटबाबत सरकारकडे येत असलेल्या तक्रारींमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसत आहे. निर्मात्यांना प्रथम स्तरावर आलेल्या तक्रारींवर काम करावे लागते. सुमारे 90 ते 92 टक्के तक्रारी त्यांच्याकडून आवश्यक बदल करून सोडवल्या जातात. तक्रार सोडवण्याची पुढील पातळी त्यांच्या सहकार्याच्या पातळीवर आहे. शेवटी तक्रार प्रशासन स्तरावर येते, जेथे विभाग समिती स्तरावर नियमांनुसार कारवाई केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत तक्रारींचे प्रमाण वाढले असून, विभाग याकडे गांभीर्याने पाहत आहे. त्यात काही बदल करायचे असतील तर त्याचा गांभीर्याने विचार करू.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

Guru Purnima 2025: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Kalyan Police News : वाहतूक पोलिसांची मनमानी, चहा पिण्यासाठी रस्त्यात गाडी उभी केली, ट्रॅफिक जाममुळे नागरिक संतापले

SCROLL FOR NEXT