Abhishek Banerjee  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Abhishek Banerjee : 'स्त्री'मध्ये काम केल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेला होता अभिषेक बॅनर्जी; कशी केली मात?

Stree Movie : सध्या 'स्त्री 2' च्या यशाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अशात 'स्त्री' मध्ये जनाची भूमिका साकारल्यानंतर अभिषेक बॅनर्जीच्या आयुष्यात डिप्रेशनचा टप्पा आला. याविषयी कलाकाराने आपला अनुभव सांगितला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र स्त्री 2 (stree 2) ची चर्चा पाहायला मिळत आहे. स्त्री 2 ला खूप कमी वेळात मोठे यश मिळत आहे. आतापर्यंत स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर 400 कोटीची कमाई केली आहे. स्त्री 2 मधील अभिनय पाहून अभिषेक बॅनर्जीचे (Abhishek Banerjee) कौतुक होत आहे. 'स्त्री 2' मध्ये जरी मुख्य कलाकार राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर असले तरी, अभिषेक बॅनर्जीचा अभिनय आणि भूमिका लोकांना प्रचंड आवडली आहे. या चित्रपटात अभिषेक बॅनर्जीची खूप महत्त्वाची भूमिका आहे.

'स्त्री' मधील 'जना' ही व्यक्तिरेखा त्याच्या करिअरसाठी मोठा ब्रेक असला तरी यानंतर त्याच्या आयुष्यात नैराश्याचा टप्पा आल्याचे त्याने सांगितले आहे.'स्त्री' रिलीज झाल्यानंतर अभिषेक बॅनर्जीने दिलेल्या एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, 'जना नंतर मला फक्त इडियट टाइप पात्र मिळत होते. मी काहीतरी रंगीत, चमकदार कपडे घालावे आणि विशिष्ट शैलीत बोलावे अशी प्रत्येकाची इच्छा होती. जाना हे फक्त एक पात्र आहे. पण खऱ्या आयुष्यात मी असा नाही. या चित्रपटानंतर मी ड्रीम गर्ल आणि बाला चित्रपट केले आणि त्यानंतर सर्वांना वाटू लागले की मी कॉमेडी एक्टर आहे.

पुढे अभिषेकने सांगितले की, कोविडच्या काळात तो डिप्रेशनमध्ये (Depression) होता आणि त्याला वाटले की आता कोणीही त्याची इतर कोणत्याही भूमिकेत कल्पना करू शकणार नाही. सर्व त्याला कॉमेडी चित्रपट मिळणार. मात्र तेव्हा पाताळ लोक हा चित्रपट आला. पुढे अभिषेक म्हणाला की, "धन्यवाद! सुदीप शर्माने 'पाताळ लोक' मध्ये हथोडा त्यागीच्या भूमिकेत माझी कल्पना केली होती. 'स्त्री' हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी या भूमिकेत माझी कल्पना केली होती, त्यामुळे सर्व श्रेय त्यांना जाते."

पाताळ लोक

मीडिया मुलाखतीत अभिषेक म्हणाला की, हथोडा त्यागी हा त्यांचा 'मोठा ब्रेक' होता, पण 'पाताळ लोक'ने त्यांच्यासाठी मजबूत वातावरण निर्माण केले. जे त्याच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचे ठरले. अभिषेक म्हणाला, 'हथोडा त्यागीनंतर मला इंडस्ट्रीतून फोन आले, पुन्हा हथोडा त्यागी नंतर मला सगळी सायको कॅरेक्टर्स मिळायला लागली. आता माझी स्वतःशी लढाई सुरु झाली की, मी सामान्य व्यक्तिरेखा देखील करू शकतो. तसेच नाटक, रोमान्स च्या भूमिकाही छान करू शकतो. अभिषेकने सांगितले की, टीका ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही आणि 'पाताळ लोक' मधील त्याच्या कामावरही काही लोकांनी टीका केली होती. तो म्हणाला, 'कोणीतरी म्हणाले- पाताळ लोकमध्ये अभिषेकने काय केले? तो जनासारखाच आहे. हे सोपे आहे.

15 ऑगस्टला एकीकडे अभिषेक 'स्त्री 2'मध्ये कॉमेडी करताना दिसला, तर दुसरीकडे 'वेदा' चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. 'वेदा' च्या रिव्ह्यूजमध्येही अभिषेकच्या कामाची खूप प्रशंसा झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT