Asha Sharma Passed Away: शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची होती इच्छा, पण..., 'आदिपुरूष' फेम अभिनेत्रीचं निधन

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांच निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.आशा शर्मा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. तरीही आशा शर्मा यांच्यावर गेले एक वर्षापासून रूग्णालयात उपचार सुरू होते. आशा शर्मा यांच्या निधनाने मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

आशा शर्मा या २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'आदिपुरूष' या चित्रपटात दिसल्या. चित्रपटात त्यांनी शबिराची भूमिका साकारली होती. आशा शर्मा यांनी ४ दशकांपेक्षा अधिक काळ सिनेसृ्ष्टीत काम केलं आहे. अनेक चित्रपट तसेच शोमध्ये त्यांनी काम केलय. वयाच्या १३ व्या वर्षी आशा शर्मा यांनी मनोरंजनविश्वात पाऊल टाकलं ते मागे वळून पाहिलचं नाही.

आशा शर्मा यांना १९८६ मध्ये रिलीज झालेल्या 'नुक्कड' आणि 'बुनियाद' या चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळाली. अनेक चित्रपट, शोमध्ये त्यांनी आव्हानात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हेमा मालिनी यांच्या 'दो दिशायन' या चित्रपटात त्यांनी काम केले. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अदिपुरूष' चित्रपटात त्यांनी शबरीची भूमिका साकारली होती.

आशा शर्मा यांना श्रद्धांजली देताना टीना घई यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी, गेल्या वर्षी 'आदिपुरूष' चित्रपटांच्यावेळी आशा शर्मा या पाय घसरून पडल्या होत्या. तेव्हा त्यांना गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून त्या अंथरूणाला खिळून होत्या. आशा शर्मा यांची शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा होती. आशा शर्मा यांच्या निधनाने संपूर्ण टिव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.